Emmanuel Macrone India Visit : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे. या भेटीने भारत आणि फ्रान्स संबंधांना एक नवी गती मिळणार आहे.
दिल्ली : 17-02-2026
आज भारतासाठी एक ऐतिहासिक आणि निर्णायक दिवस आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहे. अध्यक्ष मॅक्रॉन मुंबईत दाखल झाले असून आज ते पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतला. या भेटीत भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवार (17 फेब्रुवारी) मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेतील. या भेटीत संरक्षण सहकार्यापासून ते कृत्रिम बुद्धमत्तेपर्यंतच्या जागतिक मुद्यांवर चर्चा होणार आहेत. या भेटीत दोन्ही देशांत संरक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भेटीकडे लागले आहे.
यामुळे या भेटीला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
द्विपक्षीय संबंधावर करण्यात येणार चर्चा ( Emmanuel Macrone India Visit )
या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधावर चर्चा होणार आहे. भारत-फ्रान्समधील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाईल. यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक बळकट होतील. तसेच दोन्ही देशात संभाव्य संरक्षण करारांवरही स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये हिंद महासागरातील सुरक्षा आणि धोरणात्मक प्रगतीवर सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
हे संभाव्य करार होण्याची अपेक्षा ( Emmanuel Macrone India Visit )
- हॅमर क्षेपणास्र करार : दोन्ही देशांत राफेलनंतर आता हॅमर क्षेपणास्रावर मोठा करार अपेक्षित आहे. हे क्षपणास्र संयुक्तपणे भारतात तयार केले जाऊ शकते. यासाठी सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.
- संयुक्त नौदल सराव आणि लॉजिस्टिक्स : या भेटीत इंडो-पॅसिफिर क्षेत्रातील सुरक्षेवर सविस्तर चर्चा केली जाणार असूनल यासाठी दोन्ही देश संयुक्त नौदल सराव आणि लॉजिस्टिक्स सहकार्यावरही करार करू शकतात.
- संरक्षण करार : हेलिकॉप्टर उत्पादन, जेट इंजिन तंत्रज्ञान, पाणबुडी विकासावर संरक्षण करार होण्याची शक्यता आहे. तसेच राफेल मरीनच्या किंमती आणि इतर अटींवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन मिशिगन टाटा एअरबेस H125 हेलिकॉप्टरचे उद्धाटनही करू शकतात.
AI सहकार्य : दोन्ही देशांतलं आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी देखील करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक हितासाठी तंत्रज्ञान सुरक्षा निर्माण करणे याचा हेतू आहे.
अध्यक्ष मॅक्रॉन भारत-फ्रान्स इनोव्हेशन फोरमलाही उपस्थित राहणार आहेत. गेटवे ऑफ इंडीया येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील ते भेट देणार आहेत. ही भेट दोन्ही देशांतील नवोन्मेष आणि सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक मानले जात आहे.