शास्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर ( Dr. Jayant Naralikar )यांचे 20 मे 2025 रोजी, वयाच्या 86 वर्षी पुण्यात निधन झाले. ते फक्त खगोलशास्रज्ञ नव्हते, तर ते त्यांच्या साहित्यासाठीही तेव्हढेच ओळखले जात. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीवर नजर टाकणारा हा लेख.
जयंत नारळीकरांचे बालपण, कुटुंब आणि शिक्षण
डॉ. जयंत विष्णू नारळीकर ( Dr. Jayant Naralikar ) यांचा जन्म 19 जुलै 1938 ला कोल्हापूर येथे झाला. त्यांचे आई-वडील दोघेही उच्चविद्याविभूषीत होते. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासूदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ होते. तर त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. डॉ. नारळीकरांते शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. पुढे त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली. या परिक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांनी बीए, एमए आणि पिएचडीच्या पदव्या मिळवल्या.
कारकिर्दीतले महत्त्वाचे टप्पे –
- 1959 – गणितात बीए पदवी प्राप्त
- 1960 – खगोलशास्रासाठी टयसन पदक जिंकले
- 1962 – केंब्रिजमध्ये डॉक्टरेटच्या अभ्यासादरम्यान त्यांना स्मिथ पुरस्काराने सन्मानित
- 1963 – फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएडी पदवी प्राप्त.
- 1964 – खगोलशास्र आणि खगोल भौतिकशास्रात पदव्युत्तर पदवी मिळाली
- 1972 – भारतात परत आल्यावर मुंबई येथे टाटा इन्सिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) मध्ये प्राध्यापकपद स्विकारले.
जयंत नारळीकर यांचे संशोधन
डॉ. जयंत नारळीकर ( Dr. Jayant Naralikar ) यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी मांडली. त्यांनी यांच्यासोबत कन्फॉर्मल गुरुत्वाकर्षण सिद्धांत विकसित केला, ज्याला होयल-नारळीकर सिद्धांत म्हणून ओळखले जाते. जे अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचे आणि माकच्या तत्त्वाचे संश्लेषण करते. हा सिद्धांत असे प्रस्तावित करतो की, कणाचे जडत्वीय वस्तुमान हे इतर सर्व कणांच्या वस्तुमानांचे कार्य आहे,ज्याला जोडणी स्थिरांकाने गुणाकार केले जाते. जे वैश्विक युगाचे कार्य आहे.
स्टेडी स्टेट विश्वसिद्धांत : या सिद्धांतावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. जो बिग बँग सिद्धांताला पर्यांय म्हणून मांडला आहे. यातून धुूमकेतूच्या प्रवासाची आणि पृथ्वीवर होणाऱ्या परिणामाची कल्पना मांडली आहे.
चार दशकाहून अधिककाळ त्यांनी खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन केले होते. त्यासह त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले.
नारळीकरांना ( Dr. Jayant Naralikar ) यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट मिळाली. 2004 ला त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.
त्यांना मिळेलेले महत्त्वाचे पुरस्कार –
- पद्मविभूषण (2004 )
- पद्मभूषण (1965 )
- महाराष्ट्र भूषण (2010 )
- साहित्य अकादमी पुरस्कार (2014)
- स्मिथ पुरस्कार ( 1962 )
- ॲडम्स पारितेषिक (1967)
- कलिंग पुरस्कार ( 1996)
- प्रिक्स ज्युल्स जॅन्सेन ( 2004 )
जयंत नारळीकरांनी संशोधनासह विपूल लेखन केले. 2021 मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.
जयंत नारळीकरांची साहित्य संपदा –
- अंतराळातील भस्मासुर
- अंतराळातील स्फोट
- अभयारण्य
- चला जाऊ अवकाश सफरीला
- टाईम मशीनचा किमया
- प्रेषित
- यक्षांची देणगी
- याला जीवन ऐसे नाव
- वामन परत न आला
- व्हायरस
- अंतराळ आणि विज्ञान
- आकाशाशी जडले नाते
- गणितातील गंमतीजंमती
- नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान
- Facts And Speculations In Cosmology ( सहलेखक Geoffrey Burbidge )
- युगायुगाची जुगलबंदी गणित अन विज्ञानाची
- विश्वाची रचना
- विज्ञान आणि वैज्ञानिक
- विज्ञानगंगेची अवखळ वळणे
- विज्ञानाची गरूडझेप
- विज्ञानाची रचियते
- समग्र जयंत नारळीकर
- सेव्हन वन्डर्स ऑफ कॉसमॉस
- सूर्याचा प्रकोप
Leave a Reply