CM Devendra FadanavisCM Devendra Fadanavis

Devendra Fadanavis : सध्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत. तिथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष स्थितीची पहाणी केली. यावेळी त्यांना विचारलेल्या नेपाळच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली.

मुंबई : 25/09/2025

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis)  यांनी मराठा आरक्षणाच्या विषयापासून वोट चोरीच्या मुद्द्यावर रोखठोक उत्तर दिली आहेत. सध्या ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्याचवेळी ते म्हणाले, ‘ज्यांना नेपाळच्या Gen-Z वर प्रेम आहे, त्यांनी नेपाळला जाऊन राहिलं पाहिजे’ राहुल गांधी यांच्या Gen- Z च्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘भारत आणि नेपाळची स्थिती वेगळी आहे. ज्यांना नेपाळवर भरपूर प्रेम आहे, त्यांनी नेपाळला राहीलं पाहिजे’, ते असं सुद्धा म्हणाले की, ” भारताच्या युवकांकडे विरोध प्रदर्शनासाठी वेळ नाहीये. कारण ते स्टार्टअप्स, AI आणि आयटी सारख्या क्षेत्रात काम करतात” देवेंद्र फडणवीस इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये बोलत होते.

“भारतीय युवक इंजिनिअर आहेत. जगभरात त्यांनी आपली ओळख बनवली आहे. ते तुम्हाला सिलिकॉन व्हॅलीमध्ये दिसतील. भारताच्या जनरेशन Z चा विचार वेगळा आहे. नेपाळ सारखा विचार करून काम करत नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपल्या Gen-Z च्या नजरेतून राहुल गांधी यांचं महत्त्व काय ?  (Devendra Fadanavis)

” राहुल गांधी सर्व उपाय करून झालेत, आता ते हताश आहेत. त्यांना असं वाटतं की, Gen-Z ना अपील करून काही होऊ शकतं. पण आपल्या Gen-Z च्या नजरेत राहुल गांधी यांचं महत्त्व काय आहे ? ते आपल्याला बोलायचं नाही. भारताच्या युवकांकडे विरोध प्रदर्शनासाठी वेळ नाहीये” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राहुल गांधीनी केलेले आवाहन ? (Devendra Fadanavis)

नेपाळमधल्या प्रदर्शनानंतर राहुल गांधी यांनी देशातील विद्यार्थी आणि युवकांना 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या Gen-Z ना देशातील लोकशाही वाचवण्याचे आवाहन केले होते. देशातील मत चोरीच्या मुद्दयावर रस्त्यावर उतरवण्याचं आवाहन केलं होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis)  यांनी भारत आणि नेपाळमधील ऐतिहासिक संबंध असल्याचं मान्य केलं. पण दोन्ही शेजारी देश वेगवेगळे असल्याचे ते म्हणाले.

नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या दुष्काळासंबंधी समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पहाणी केली. लोकांशी, शेतकऱ्यांशी बोलून त्यांनी नुकसानीचा अंदाज घेऊन, शेतकरी आणि पुरग्रस्तांच्या मदतीची घोषणा केली.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!