DCM Sunetra Ajit Pawar : मुंबईतील राजभवन येथे सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. तसेच त्यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत.
मुंबई : 31-01-2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या माजी खासदार सुनेत्रा पवार (DCM Sunetra Ajit Pawar) यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राजभवन येथे आज त्यांच्या शपथविधी सोहळा पार पडला. सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वाधिकार असणार आहेत.
सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ (DCM Sunetra Ajit Pawar)
मुंबईतील राजभवन येथे सुनेत्रा पवार (DCM Sunetra Ajit Pawar) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आजच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार, वरिष्ठ नेते आणि मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते
आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहेत.