Corona Virus -19

Corona Virus Update, Kerala And Maharashtra Have Highest  No casese  : देशात कोरोना व्हायरसच्या पेशंटची संख्या सारखी वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. देशभरातून केरळ आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त केस ॲक्टिव केस आहेत. केरळ मध्ये 430 आणि महाराष्ट्रात 210 केस आहेत. दिल्ली, गुजरात आणि कर्नाटक मध्येही रूग्णांची संख्या वाढत आहे. 

आरोग्य : 2025-05-27

देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्याची कोरोना व्हायरसची संख्या ही 1045 मध्ये इतरी झाली आहे. केरळ मध्ये सर्वात जास्त म्हणजे, 430 ॲक्टिव कोरोना केसेस आहेत. महाराष्ट्रात 210, दिल्लीत 104  आणि गुजरातमध्ये 83 केसेसची नोंद करण्यात आली आहे. कर्नाटकातही एकुण 80 केस आहेत, ज्यातील 73 बंगळूर मधील आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक मध्ये मिळून अत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू कोरोना 19 व्हायरसने झाला आहे. यातील 8 जणांचा मृत्यू हा कोरोनाची लागण झाल्यापासून 8 दिवसात झाला आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वात जास्त म्हणजे 5 आहे. सोमवारी ठाण्याच्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका आठवड्यात 787 नवीन रूग्ण आढळले आहेत. 

24 तासात कोरोनाने 3 मृत्यू 

राजस्थान च्या जयपूरमध्ये सोमवारी दोनजणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यातील एकजण मृतअवस्थेत रेल्वेस्टेशन वर सापडला, जो कोरना पॉझिटीव्ह होता. दुसरा मृत्यू हा एका खाजगी हॉस्पिटलमध्ये झाला. हा एक 26 वर्षीय युवक होता. ज्याला पहिल्यापासून टिबी झाला होता. 

महाराष्ट्रात ठाण्याच्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 25 मेला एका युवकाचाही (वय 21 ) ठाण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  याआधी कर्नाटकात एका 84 वर्षीय वृद्धाचा मृत्यू हा मल्टि ऑर्गन फेल झाल्याने झाला, मात्र तोही कोरोनापॉझिटिव्ह होता. केरळ मध्येही 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

भारतात कोरोनाचे 4 व्हेरियंट 

इंडियन कांऊसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR ) चे डायरेक्टर डॉ. राजीव बहल यांनी सांगितले आहे की, आतापर्यंत देशात कोविड – 19 चे चार व्हेरियंट सापडले आहेत. ज्यात LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 व्हेरियंटचा समावेश आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने  ( WHO ) मात्र या चार व्हेरियंटला फार गंभीर मानत नाहिये. चिंतेचा विषय नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिलेला आहे. तथापि, हे सर्व व्हेरियंट देखरेखीखाली असणाऱ्या प्रकारात मानले जातात. चीनसह आशियाई देशांमध्ये कोविडच्या वाढत्या प्रकारांमध्ये हे प्रकार आहेत. NB.1.8.1 या प्रकारासह A435S, V445H आणि T478I सारखे व्हेरियंट इतर व्हेरियंटच्या तुलनेत जास्त प्रादुर्भाव करतात, आणि त्यांच्यावर कोविडमुळे मिळवलेल्या इम्युनिटीचाही काही फरक पडत नसल्याचे सांगितले आहे. सुदैवाने भारतात हे प्रकार नसल्याने चिंता नाही.   

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!