Corona Virus Thane Maharashtra Update – कोरोनाने सध्या पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याचे चित्र केरळ सह महाराष्ट्रात दिसत आहे. पुणे, मुंबईत काही पेशंटला कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या असताना, ठाणे जिल्ह्यात कोवीड-19 च्या संक्रमणाने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
ठाणे : 2025-05-27
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस पुन्हा एकदा पसरत असल्याचे वृत्त आहे. केरळ नंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना संक्रमणाच्या केसेस दाखल झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्याच्या ( Thane ) एका खासगी रूग्णालयात कोविड- 19 साठी उपचार घेत असणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेनेही (KDMC ) कोरोना व्हायरस संक्रमणनाने एक मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ठाणे जिल्ह्यातील हा दुसरा मृत्यू आहे.
केडीएमसी च्या स्वास्थ्य विभागाचे प्रभारी अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी सोमवारी कोरानाबाधीताच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुंबईला लागून असलेल्या राज्यातील काही भागात कोरोना विषाणू संसर्गाचे रूग्ण वाढल्यानंतर महानगरपालिका क्षेत्रात चार जणांना कोविड- 19 ची लागण झाल्याती पुष्टी त्यांनी केली.
डॉ.दीपा शुक्ला म्हणाल्या की, यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या एका रूग्णाला उचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तिसऱ्या बाधीत व्यक्तीवर खाजगी रूग्णालयात उपचार सूरू असून, चौथ्या व्यक्तीला उपचारासाठी कळवाच्या छत्रपति शिवाजी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे.
घाबरून जाऊ नका : डॉ.शुक्ला
आरोग्य विभागाच्या प्रभारी अधिकारी शुक्ला यांनी सांगितले की, लोकांनी घाबरून जाऊ नका. आरोग्याविषयक खबरदारी घेऊन, नियमांचे पालन करा. आरोग्य विभागाने इतर आजारी पेशंट आणि ज्येष्ठ्य नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्कचा वापर करा अशा प्राथमिक खबरदारी घ्या असा सल्ला दिला आहे.
विभागाने म्हटले आहे की, केडीएमसी ने कल्याणच्या बाई रूक्मीणीबाई हॉस्पिटल आणि डोंबिवलीच्या शास्री नगर हॉस्पिटल मध्ये व्हेंटिलेटर आणि विलगीकरण कक्षाची सुविधा तयार ठेवली आहे.या दोन्ही ठिकाणी कोरोना व्हायरस टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ठाण्यात एकुण 36 केस
ठाणे महानगरपालिकेच्या (Thane ) जनसंपर्क अधिकारी यांनी माहिती दिली आहे की, शहरात आतापर्यंत कोविड-19 च्या 36 केसेस समोर आल्या आहेत. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले की, 36 रूग्णांपैकी 9 जण स्थिर स्थितीत असून हॉस्पिटल मध्ये भर्ती आहेत. उरलेल्यांना घरी आयसोलेशन मध्ये ठेवले आहे.
Leave a Reply