Coldrif Cough Syrup Ban :राजस्थानमध्ये कोल्ड्रीफ कफ सिरपमुळे 18 बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात मोठी खळबळ माजली. आता महाराष्ट्रातही या औषधावर बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई : 06/10/2025
राजस्थानमधील 18 बालकांचा कोल्ड्रीफ कफ सिरपमुळे मृत्यू झाल्यानंतर, महाराष्ट्रात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्ड्रिफ कफ सिरपवर (Coldrif Cough Syrup Ban) महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून, या औषधाची विक्री, उत्पादन आणि वितरण थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिरपच्या सेवनामुळे 18 बालकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्ड्रिफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल नावाचा विषारी घटक आढळून आला आहे, जो वाहनांच्या ब्रेक ऑईलमध्ये वापरला जातो. या घटकामुळे बालकांची किडनी निकामी होऊन त्यांचे प्राण गेले.
राज्य शासनाने लागू केलाय टोल फ्रि क्रमांक (Coldrif Cough Syrup Ban)
राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने याबाबत एक टोल फ्रि क्रमांक (1800 222 365 ) लागू केला आहे. मेडिकल दुकानांमध्ये एप्रिल 2017 ते मे 2025 या कालावधीमधील कोल्ड्रिफ सिरपचा साठा आढळ्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, औषध निरिक्षकांना असा साठा गोठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाचाही निर्णय (Coldrif Cough Syrup Ban)
केंद्र सरकारनेही या घटनेनंतर सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावून बालकांना खोकल्याची औषधे सावधगिरीने देण्याचे निर्देश दिले आहेत. दोन वर्षांखालील मुलांना खोकल्याचे औषध अजिबात न देण्याचा आणि पाच वर्षांंखालील मुलांना डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय औषध न देण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
राजस्थानमधील घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, लहान मुलांच्याबाबतीत अधिक सावधानतेने औषधांची निवड करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
Leave a Reply