CM Devendra Fadnavisमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा केली.

CM  Fadnavis, Good News For Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटांनी घेरला आहे. अशा परिस्थीतीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय आपण जाणून घेऊ.

मुंबई : 30/09/2025

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी बँकांकडून मिळालेल्या कर्ज वसुलीच्या नोटीसा जुन्या असल्यामुळे , आता कुठेही कर्ज वसुली केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी (CM  Fadnavis ) स्पष्ट केले आहे. या संदर्भात, राज्यातील बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी शेतकऱ्यांकडून कोणतीबी वसुली करू नये.

या जुन्या नोटीसांचा मुद्दा काही दिवसांपूर्वी एका जिल्ह्यामध्ये निदर्शनास आला होता. या एका जिल्ह्याच्या घटनेनंतर अशा प्रकारच्या अनेक जुन्या नोटीसा अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याते दिसून आले. या गंभीर प्रकारची दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पाऊल उचलले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, अशा जुन्या नोटीसा आमच्या निर्दशनास आल्यानंतर, तात्काळ बँकांशी संपर्क साधून त्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे, आता महाराष्ट्रातील कोणत्याबी शेतकऱ्याला जुन्या कर्ज वसुलीसाठी त्रास दिला जाणार नाही याची सुनिश्चिती केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी (CM Fadnavis ) म्हटले आहे. बँकांनी या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असेही त्यांना सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!