Maharashtra Education

Hindi Language Manadatory Decision Withdrawn : मराठी भाषेची अस्मिता धोक्यात येणार असल्यामुळे राज्य सरकार सर्वच स्तरातून टीका होत होती. अखेर वाढता विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे. 

मुंबई : 24/06/2025

महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत सर्वच शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र मराठी भाषेची अस्मिता धोक्यात येणार असल्यामुळे राज्य सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत होती. अखेर वाढता विरोध पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे. 

त्रिभाषा सुत्रासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भिसे, डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. या बैठकीनंतर हिंदी भाषेच्या पर्यायाबाबत भाषा तज्ञ, साहित्यिक, राजकीय नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 

देशातील इतर राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, मराठी मुलांचं ॲकॅडेमिक नवीन शिक्षण धोरणांतर्गत बँक क्रेडिटच्या अनुषंगाने होऊ नये, यासाठी इतर पर्यांयांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे तज्ञ, साहित्यिक, राजकीय नेते, यांच्यासमोर सादरीकरण आणि सल्लामसलत प्रक्रिया करण्याविषयी बैठकीत ठरल्याचीही माहिती मिळत आहे. 

 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!