CM Devendra fadnavis

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग केला. यावेळी वारकरी भक्ती योग या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

पुणे :2025-06-21

आज संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी या दिवसाच्या निमित्ताने योगसाधना केली. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने योगसाधना केली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, प्रो.सदानंद मोरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 

 मुख्यमंत्र्यांच्या  उपस्थितीत यावेळी वारकरी भक्ती योग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, योग ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. योग मुळे अनेक प्रकारच्या व्याधींपासून सुटका होते. योग शरिरासह आपल्या मनालाही निरोगी ठेवतो. आपल्या या प्राचीन परंपरेला सर्व जगाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघात योग दिवसाचा प्रस्ताव मांडला. हा एकमेव प्रस्ताव आहे , ज्याला जगातील सर्व देशांनी मान्यता दिली. ज्यामुळे आज जगभरात योग दिवस साजरा केला जातो. 

उद्धव ठाकरे गटावर शिंदेंचा वार 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, 21 तारखेला आम्ही एक मोठा योग केला होता ( शिवसेनेला दोन गटात विभागले) ते मॅरेथॉन गट होता. या योगची सुरुवात मुंबईपासून झाली आणि यामुळे 21 जूनपासून महाराष्ट्रात बरंच काही बदलले गेले. आम्ही येथे विकास पहात आहोत. आमचे सरकार लोकांसाठी कामे करत आहे. देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करत आहोतय.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!