CET EXAM Rule 2026सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर; कॉपी केल्यास होणार कडक कारवाई (फोटो-सोशलमीडिया)

CET EXAM Rule 2026 : सीईटी परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सुधारित नियमावली जाहीर केली आहे.

पुणे : 12-03-2026 

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या 2026 च्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) (CET EXAM Rule 2026) नोंदणीची मुदत संपत आली असून, आतापर्यंत 12 लाख 92 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा प्रथमच तीन अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी दोन संधी देण्यात आल्यामुळे सुमारे 17 लाख 39 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सुधारीत नियमावली जाहीर केली आहे.

सीईटी कक्षाकडून 17 अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यापैकी 15 परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर संगणकाधारित पद्धतीने घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उमेदवार, परीक्षा कर्मचारी किंवा संस्थांकडून कोणताही गैरव्यवहार, गैरवर्तन किंवा अनुचित मार्गांता वापर झाल्यास कठोर कारवाई करण्याची तरदूत करण्यात आली आहे. त्यासाठी गैरप्रकारांचे स्वरूप लक्षात घेऊन शिक्षा आणि दंड निश्चित करणारी सुधारित नियमावली प्रसिद्ध कऱण्यात आली आहे.

परीक्षेदरम्यान बोलणे, संकेत देणे, कॉपी करणे, नोटस किंवा लिखित साहित्य वापरणे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रश्न किंवा उत्तरे पाठविणे, तोतयागिरी करणे किंवा सामूहिक नक्कल करणे अशा प्रकारांनी गंभीर गैरप्रकार मानण्यात आले आहे. अशा प्रकरणांत चालू शैक्षणिक वर्षातील सीईटीसह इतर परिक्षांसाठीची उमेदवारी रद्द कऱण्याची तरतूद कऱण्यात आली आहे.

एआय आणि डिजिटल साधनांवर बंदी (CET EXAM Rule 2026)

नवीन नियमालसीनुसार परीक्षेदरम्यान स्मार्टफोन, मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ उपकरणे, इयरफोन, कॅलक्युलेटर (आवश्यक तिथे) यांसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट बाळगणे किंवा वापरणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता  (एआय) साधने, लपविलेले कॅमेरे, स्क्रिन मिररिंग, रिमोट ॲक्सेस सॉफ्टवेअर किंवा अन्य डिजिटल साधनांचा वापर केल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द करून आयटी कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

गैरप्रकार झाल्यास केंद्राची मान्यता कायमची रद्द (CET EXAM Rule 2026)

परीक्षा केंद्रासाठीही कडक नियम लागू कऱण्यात आले आहेत. केंद्रांवर सीसीटीव्ही व्यवस्था, बायोमेट्रीक पडताळणी आणि कडक देखरेख बंधनकारक कऱण्यात आली आहे. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता तात्पुरती किंवा कायमची रद्द कऱण्याता अधिकार सीईटी कक्षाला राहणार आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!