Central Railway Special Giftमध्य रेल्वेची प्रवाशांसाठी भेट, होळी होणार विशेष, 209 अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडणार.

Central Railway Special Gift :  होळी हा सण एक महत्त्वाचा सण आहे. यासाठी मुंबईतील नोकरदार आणि इतर ठिकाणाहूनचे प्रवाशी आपल्या गावी जातात. त्यासाठी आता मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठे गिफ्ट दिले आहे. कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत. कोणते आहेत हे मार्ग ते जाणून घेऊ.

मुंबई : 13-02-2026 

होळीसारख्या महत्त्वाच्या सणाला राज्यातून प्रवासी वाढतात. ही गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूर, चिपळूण, रत्नागिरीसह विविध ठिकाणांसाठी तब्बल 209 होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेने यंदाच्या होळी उत्सवासाठी देशभरात एकुण 1410 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आखली आहे. त्यामध्ये मध्य रेल्वेचा मोठा वाटा आहे.

मुंबई-नागपूर-मुंबई, मुंबई-रत्नागिरी-मुंबई, मुंबई-चिपळूण-मुंबई व अन्य महत्त्वाच्या मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेतय दरवर्षी होळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी आपल्या मूळ गावी परततात. त्यामुळे नियमित गाड्यांवरील ताण वाढतो. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि अतिरिक्त गर्दीचा भार कमी करण्यासाठी या विशेष गाज्या चालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्यांमध्ये वातानुकुलित (एसी) कोच असलेल्या गाड्या, एसीसह शयनयान (स्लीपर) सुविधा असलेल्या गाड्या व सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच असलेल्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय अल्प अंतराच्या प्रवाशांसाठी अनारिक्षित विशेष गाड्याही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध उत्पन्न गटातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

वेळापत्रक रेल्वेच्या संकेतस्थळावर  ( Central Railway Special Gift )

होळीच्या काळात सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाची सोय व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. विशेष गाड्यांचे वेळापत्रक आणि आरक्षणाबाबतची माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर व आरक्षण केंद्रावर उपलब्ध होणार आहे.

मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या  ( Central Railway Special Gift )

आता प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते नागपुर, कोल्हापुर, सावंतवाडी रोड आणि पुणे ते नागपुर दरम्यान 24 स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पेशल गाड्यांमुळे नागरिकांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळणार आहे.

टिळकनगर-नागपुर सुपरफास्ट ट्रेन ( Central Railway Special Gift )

एलटीटी ते नागपूर 01021 सुपरफास्ट स्पेशल 14 आणि 21 फेब्रुवारी रोजी एलटीटीहून रात्री 12.55 वाजता निघून दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. परतीसाठी 01022 ट्रेन 14 आणि 21 फेब्रुवारी रोजी नागपूरहून रात्री 8 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 11.45 वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी (फक्त 01122 साठी ), नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापुर, शेगाव, अकोला, मूर्तीजापुर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकात थांबा दिला आहे. याशिवाय पुणे-नागपूर दरम्यान 4 ट्रेन चालविण्यात येणार आहे. प्रवासी या गाड्यांचे आरक्षण करू शकतात.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!