Caste Census Date : जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर झाली असून, मिळालेली माहीती 1 मार्च 2027 रोजी सार्वजनिक करण्यात येणार आहे. जात गणनेसह लोकसंख्या गणना सुद्धा केली जाणार आहे. त्यासंबधीचे अध्यादेश 16 जून 2025 पर्यंत एका अधिकृत पत्रकाद्वारे काढण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : 2025-06-04
केंद्र सरकारने जनगणनेच्या (Caste Census Date ) तारखा जाहिर केल्या आहेत. ही जनगणना दोन टप्प्यात पार पाडली जाणार आहे. गृहमंत्रायलाकडून बुधवारी (4 जून ) सांगण्यात आले आहे की, जनगणनेचा पहिला टप्पा हा 1 ऑक्टोबर 2026 ला सुरू करण्यात येणार आहे. या जनगणनेसह जात गणनासुद्धा करण्यात येणार आहे.
पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 रोजी 4 पहाडी राज्यात करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-कश्मिर आणि लडाख येथे पहिल्या टप्प्यातील जनगणना करण्यात येणार आहे. बाकी राज्यांमध्ये 1 मार्च 2027 पासून दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे.
Table of Contents
गृहमंत्रायलाकडून माहिती
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे, ज्यात म्हटले आहे की, जातींच्या गणनेसह जनगणनाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबधीची अधिसूचना 16 जून 2025 पासून एक अधिकारपत्रक काढून करण्यात येणार आहे.
30 एप्रिलला केली होती घोषणा
केंद्रेने 30 एप्रिल 2025 ला जात निहायगणना( Caste Census Date ) करण्याची घोषणा केली होती. देश स्वतंत्र्य झाल्यापासून ही प्रथम जात गणना असणार आहे. केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, मुळ लोकसंख्येसह जात जनगणना करण्यात येणार आहे.
2011 मध्ये करण्यात आली शेवटची जनगणना
कॉंग्रेससह बाकीचे राजकीय पक्ष जात जनगणनेची मागणी करत होते. देशात शेवटची जनगणना ही 2011 मध्ये करण्यात आली होती. ही जनगणना दर दहा वर्षांनी केली जाते. त्यानुसार त्यानंतरची जनगणना ही 2021 मध्ये केली जायला हवी होती. परंतु कोविड-19 च्या साथीने त्याला स्थगिती देण्यात आली होती.
एससी-एसटी चा डेटा
मनमोहन सिंह सरकारच्या काळात 2011 मध्ये सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना केली गेली होती. ही जनगणना ग्रामीण विकास मंत्रालय, शहर विकास मंत्रालय आणि गृह मंत्रालयाकडून करण्यात आली होती. परंतु या जनगणनेतून मिळालेली सर्व माहिती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर फक्त एससी-एसटी समाजाचा डेटाच उपलब्ध आहे.
जनगणना अधिनियम 1948 मध्ये एससी-एसटी च्या गणनेची तरतूद आहे. ओबीसी जात गणनेसाठी अजून अभ्यासाची गरज आहे. त्यामुळे ओबीसी मधील 2,650 जातींची माहिती समोर येणार आहे. 2011 मध्ये केलेल्या जनगणनेनुसार 1,270 एससी, 748 एसटी जाती आहेत. 2011 मध्ये एससी जातींची लोकसंख्या 16.6 टक्के आणि एसटी ची 8.6 टक्के इतकी होती.
Leave a Reply