Sai Temple Shirdi

Sai Temple Shirdi : शिर्डी येथील साई मंदिरातील फुल,हार, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी उठवण्यात आली आहे. यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मंदिरात हार,फुल नेताना बिलाची पावती दाखवावी लागणार आहे.

शिर्डी : 2025-06-13

पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे भारत-पाकिस्तान मधील तणाव वाढवा होता. या युद्धपरिस्थीतीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने देशातील काही देवस्थानांमध्ये काही नियम लागू करण्यात आले होते. ते निर्बंध उठवण्यात आले आहेत. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई मंदिरात भाविकांना फुल,हार,प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली होती. भारत-पाकिस्तान दरम्यान परिस्थीती सामान्य झाल्यामुळे ही बंदी उठवण्यात आली आहे. 

साई मंदिरातील फुल,हार,प्रसाद बंदी उठवल्यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाविकांना आता पूर्वी प्रमाण मंदिरात फुल,हार,प्रसाद नेता येत आहे. परंतु फुल,हार,प्रसाद नेताना प्रवेशद्वार बिलाची पावती दाखवणे बंधनकारक असणार आहे. बिलाची पावती नसणाऱ्यांसाठी बंदी कायम असणार आहे.

साई संस्थान क्रेडीट सोसायटीमार्फत फुल,हार,प्रसाद विक्री सुरू करण्यात आली आङे. भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी खाजगी फुल,प्रसाद विक्रेत्यांसाठी नवीन नियमावली तयार करण्यात येणार आहे.
साई भक्तांना पूजेचे सामान मंदिरात नेता येणार आहे. मात्र त्यासाठीही पावती आवश्यक असणार आहे. खासगी दुकानदारांचे दर निश्चित नसल्यामुळे त्यांच्याकडून पावती मिळत नाही. यामुळे भाविकांना संस्थेच्या क्रेडीट सोसायटीमधूनच पावती घ्यावी लागणार आहे. 

शिर्डीतील साई मंदिरात देशभरातून भाविक येत असतात. तिरूपती बालाजीनंतर हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. या मंदिरात नेहमीच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यात समान्यांपासून सेलिब्रिटींचाही समावेश आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!