Balgandharva Rangmandir Redevelopmentबालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास होणार; महापालिका 185 कोटी रुपये खर्च करणार.

Balgandharva Rangmandir Redevelopment : पुण्याची सांस्कृतिक ओळख आणि रंगभूमीचे मुख्य व्यासपीठ असणारे बालगंधर्व रंगमंदिरांचा पुनर्विकास केला जाणार आहे. या ठिकाणी तीन थिएटर उभी केली जाणार आहेत.

पुणे : 13-03-2026 

पुणे हे शहर सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकांसाठी प्रसिद्ध आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य व्यासपीठ मानले जाणारे ‘बालगंधर्व’  (Balgandharva Rangmandir Redevelopment )रंगमंदिराचा पुनर्विकास होणार आहे. या ठिकाणी तीन थिएटर उभी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिका सुमारे 185 कोटी रुपये खर्च कऱणार आहे. पुणे महापालिकेने या ऐतिहासिक रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या भव्य पुनर्विकास प्रकल्पावर सुमारे 185 कोटी खर्च केले जातील. या नवीन संकुलाचे सर्वाच महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळी आसन क्षमता असणारे तीन थिएटर बांधले जाणार आहे.

महानगरपालिका या ऐतिहासिक रंगमंदिराचे जागतिक दर्जाच्या आधुनिक संकुलात रुपांतर करणार आहे. पुणे शहरातील एक ऐतिहासिक आणि प्रमुख रंगमंदिर म्हणून, बालगंर्धर्व रंगमंदिराची स्वतःची वेगळी ओळख आहे. गौरवशाली बालगंधर्व रंगमंदिर हा एक महान सांस्कृतिक वारसा आहे. हे रंगमंदिर 54 वर्षांपूर्वी पु.ल.देशपांडे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आले होते. सर्व कलाकारांना त्यांची कला बालगंर्धव येथे सादर करण्याची इच्छा असते. मात्र, अपुऱ्या जागेमुळे, अपुऱ्या बुकिंगमुळे प्रत्येक कलाकारांना संधी मिळत नाही. मराठी नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महत्त्वाच्या राजकीय बैठका येथे आयोजित केल्या जातात. ही इमारत आता जुनी झाली आहे, त्यामुळे आधुनिक स्वरुपाची पुनर्बांधणी आवश्यकता आहे.

या समस्येवर लक्ष केंद्रीत करून, 2017 मध्ये तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आधुनिक इमारत, कलादालन, खुले रंगमंच आणि पार्किंग सुविधा विकसित करण्याची योजना सादर केली. तथापि, नाट्य उद्योगातील काही सदस्यांच्या विरोधामुळे ही योजना मागे पडली. परंतु आता महानगरपालिका प्रशासनाने या पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी घेतली आहे.

परंपरा, आठवणी जपल्या जाणार  (Balgandharva Rangmandir Redevelopment)

सध्याचे बालगंर्धव रंगमंदिर 22,000 चौरस फूट जागेवर व्यापलेले आहे. मूळ रचना पाडून 3.5 लाख चौरस फूट रंगमंदिर बांधले जाईल. नवीन इमारतीत एक हजार, पाचशे आणि तीनशे लोकांची क्षमता असलेले तीन थिएटर असतील. याव्यतिरिक्त, नवीन इमारतीत तीन नवीन कलादालने असणार आहे. एक 10 हजार चौरस फूट क्षेत्रफळाची आणि दोन 5 हजार चौरस फूट क्षेत्रफळाची. सध्या, कलादालनात फक्त 500 चौरस फूट जागा आहे. याशिवाय, नवीन इमारतीत 800 ते 900 दुचाकी आणि ३50 चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची जागा असणार आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!