Balasaheb Thackeray Art Galleryबाळासाहेब ठाकरे कलादालन नोव्हेंबरमध्ये खुले होणार आहे.

Balasaheb Thackeray Art Gallery : यंदाच्या दिवाळीत विद्यार्थी आणि कलाप्रेमी यांच्यासाठी खास सरप्राईज गिफ्ट आहे. कारण मीरा-भाईंदर येथे 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे उद्धाटन होणार आहे. त्यानंतर ते कलाप्रेमींसाठी खुले होणार आहे.

मुंबई : 15/10/2025

दिवाळीच्या शूभमुहुर्तावर मुंबईत कलाप्रेमींसाठी एक मोठे सरप्राईज मिळणार आहे. हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे उदघाटन होणार आहे (Balasaheb Thackeray Art Gallery). त्यानंतर ते कलाप्रेमींसाठी खुले होणार आहे. या कलादालनाचे काम पूर्ण झाले आहे आणि आता ते 17 नोव्हेंबर या दिवशी म्हणजेच शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला ते रसिक कलाप्रेमींसाठी खुले होणार आहे.

या भव्य कलादालनासाठी सुमारे 180 करोड रूपये इतका मोठा निधी संमत करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांमुले हे अत्यंत आधुनिक आणि परंपरा यांचा मिलाफ असणारे कला केंद्र तयार झाले आहे.

किडस झोन (Balasaheb Thackeray Art Gallery)

दिवाळीच्या सुटीत विद्यार्थ्यांना ज्ञान आणि मनोरंजन या दोन्हींचा लाभ होणार आहे. या कलादालनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, येथे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगळे दालन तयार केले गेले आहे. या किडस झोनचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे नवे तंत्रज्ञान आणि एआय चा वापर करण्यात आला आहे. हे ‘किड झोन’ 18 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांसाठी निशुःल्क खुले असणार आहे. त्यासाठी त्याचे रेजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.

स्टडी झोन (Balasaheb Thackeray Art Gallery)

किडस झोन प्रमाणे येथे एक दालन हे खास स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी बनवण्यात आला आहे. येथे बसून विद्यार्थी शांतपणे अभ्यास करू शकतील अशी सुविधा निर्माण केली गेली आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी येथे जुन्या गाण्यांचे ऑडियो संग्रहही येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कलादालनाची आणखी वैशिष्ट्ये (Balasaheb Thackeray Art Gallery)

या कलादालनात होलोग्राम, मल्टिमीडिया आणि ऑडियो-व्हिज्युएल प्रदर्शन, ई-लायब्ररी, संगीत केंद्र, एम्फिथिएटर आणि कॉन्फरन्स हॉल अशा अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. पर्यावरणाचा विचार करून येथे सौर फर्जा, वर्षा जल उर्जा आणि कचरा पुनर्प्रक्रिया प्रणाली सुद्धा निर्माण करण्यात आली आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे की, महाराष्ट्रातील ही सर्वात पहिली आर्ट गॅलरी आहे की, जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केली आहे. मीरा-भाईंदर येथील नागरिकांना आता लांब मुंबईंत किंवा काळा घोडा येथे जावे लागणार नाही, ही आर्ट गॅलरी त्यांच्यासाठी कला आणि संस्कृतीचे नवीन केंद्र बनणार आहे. याचा उद्देश्य शहरात कला, संस्कृती आणि रचनात्मक विकास करणे आणि विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी परिचय करून देणे हा आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!