Australia Racist Attack On Indianऑस्ट्रेलियात भारतीय शीख तरूणावर प्राणघातक हल्ला ! 3 जणांकडून बेदम मारहाण ( फोटो-सोशलमीडियावरून संग्रहीत)

Australia Racist Attack On Indian: ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या व्यक्तीवर हल्ला झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तरूणावर हल्ला झाला असून त्याला इंडियन डॉग म्हणून शिविगाळ कऱण्यात आली आहे. या घटनेने शीख समुदायात तीव्र संताप उसळला आहे.

सिडनी : 20-02-2026

ऑस्ट्रेलियात पुन्हा एकजा भारतीय तरूणावर हल्ल्याची (Australia Racist Attack On Indian) घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे जिलॉन्ग शहरात ही घटना घडली असून वर्णभेदावरून हल्ला कऱण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे जिलॉन्ग शहरात ही घटना घडली आहे. वर्णभेदावरून हल्ला करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. एक 22 वर्षीय भारतीय शीख तरूणावर निर्घृणपणे हल्ला कऱण्यात आला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातील शीख समुदायात संतापाची लाट उसळली आहे. या तरूणाचे नाव हमनप्रीत सिंग असल्याचे स्पष्ट  झाले आहे.

हरमनप्रीत सिंग सोबत काय घडले ?  (Australia Racist Attack On Indian)

हरमनप्रीत सींग व्यवसायाने एक नर्स आहे. मंगळवारी (17 फेब्रुवारी) रात्री तो मेलबर्नच्या कोरियो येथील एका जिममध्ये व्यायामासाठी गेला होता. यावेळी रात्री 11च्या सुमारास तीन अज्ञान व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला. सुरूवातीला हरमीनप्रीतने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु तो जिममधून बाहेर पडताच त्या तिघांनी हरमनप्रीतला मारहाण करायला सुरूवात केली. त्यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्याची तुलना कुत्र्याशी करत, इंडियन डॉग, गो बॅक असे म्हटले.

हरमनप्रीतला गंभीर दुखापत  (Australia Racist Attack On Indian)

या हल्ल्यात हरमनप्रीतच्या नाकावर गंभीर जखमा झाल्या आहेत. एका हल्लेखोराने हमरनला आपल्या डोक्याने जोरदार धडक दिली. त्याच्या नाकावर जोरदार प्रहार केला. यामुळे त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. यामुळे तो खाली कोसळला. पण हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी त्याला बेदम मारहाण केलीय या घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

सध्या हरमनप्रीतला रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. हरमनप्रीत माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याने कोणाचेही काही बिघडवलेले नाही. परंतु त्याला तुच्छ वागणुकीला सामोरे जावे लागले. मला आता जिममध्ये जायला देखील भीती वाटत असल्याचे हरमनने म्हटले. या घटनने हरमनप्रीतच्या कुटुंबालाही मोठा धक्का बदला आहे. कुटुंबाने स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा अनिवासी भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. परदेशात राहणार भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये भारतीय विद्यार्थी, व्यक्तींवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. या घटनेने शीख समुदायांत संतापाची लाट उसळली आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!