Amit Shaha, Pahelgam Attack, Jammu Kashmir

केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Amit Shaha )यांनी पहलगाम हल्ल्यानंतर  (Pahalgam Attack )दहशतवादावर जोरदार हल्लाबोल करत, तिखट प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवाद्यांना वेचून वेचून मारू. आता दहशतवाद मुळापासून उखडून टाकणार आहोत. दहशतवादाविरूद्धची ही लढाई सुरूच रहाणार आहे, असे उद्घार त्यांनी काढले आहेत. 

दिल्ली : 2025-05-01

पहलगाम हल्ल्याच्या (Pahalgam Attack ) नंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली पहायला मिळत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  (Amit Shaha )  यांनी त्याबाबत पहिल्यांदाच मोठे वक्तव्य केले आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी दहशतवादावर जोरदार प्रहार करत, हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी सरकारच्या काळात प्रत्येक दहशतवादी कृत्याला जोरदार प्रत्युदार दिले जाईल, असे ते म्हणाले. दहशतवाद्यांना वेचून वेचून मारणार. पहलगाममधील दोषींना सोडणार नाही, सूड घेतला जाईल. दहशतवाद्यांच्या आकांना (म्हेरक्यांना) आता सोडणार नाही, असा इशारा अमित शहा यांनी दिला. दहशतवाविरूद्ध आमचे शून्य सहनशिलतेचे (Zero Tolarance ) धोरण आहे, असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

22 एप्रिल ला जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे भयानक दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. 25 पर्यटक आणि 1 स्थानिक घोडेवाला यांचा त्यात समावेश होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे कश्मिरचे निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी पर्यटकांची याकाळात गर्दी होत असते. त्याचाच फायदा घेत दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपल्या बंदूकीचे लक्ष्य बनवले.  त्यानंतर अमित शहा लागलिच कश्मिरला रवाना झाले होते. त्यानंतर ते दिल्ली येथे यासंदर्भात बोलत होते. 

अमित शहा यावेळी म्हणाले की, काश्मिरमध्ये ९० च्या दशकापासून दहशतवाद सुरू आहे. त्यांच्याविरूद्ध झिरो टॉलरन्स धोरण सुरूच आहे. आपल्या 26 लोकांना मारून ते त्यांचे ध्येय साध्य करतील असं समजू नये. एखादी भ्याड कृती करून आपला विजय झाला, असं कोणी समजत असेल तर मी हे ठामपणे सांगू इच्छितो की कोणालाच सोडणार नाही. देशातील इंचा-इंचातील दहशतवाद आम्ही मुळापासून उखडून फेकू आणि दहशतवाद संपवू, असा इशारा अमित शहा यांनी दिला. 

हा लढाईचा अंत नाही, चुन-चुन के जवाब देंगें – अमित शहांचा निर्धार 

हा लढाईचा अंत नाही, सुरूवात आहे, असेही ते म्हणाले. दहशतवाद पसरवत आहेत त्यांना मी सांगतो की आम्ही त्यांना वेचून वेचून शोधून काढणार आहोत आणि त्यांना चोख उत्तर देणार आहोत. दहशतवादाच्या समूळ उच्चाटनापर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे. या कृत्याची शिक्षा दहशतवाद्यांना निश्चित मिळणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. 

 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!