Ajit Pawar Plane Accident Reportअजितदादांच्या विमान अपघाताच्या अहवालाने खळबळ, ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर !

Ajit Pawar Plane Accident Report : रोहित पवार यांच्या दाव्यानुसार अजितदादांच्या विमान  अपघाताविषयी शंका उपस्थित केली जात आहे. असे असतानाच आता डिजीसीएचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे.

मुंबई : 28-02-2026 

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अजूनही वेगवेगळे दावे केले जात आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे नेते रोहीत पवार यांनी अजितदादांसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा दावा करताना त्यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेऊन वेगवेगळे फोटो, कागदपत्रे दाखवलेले आहेत. रोहित पवार यांच्या दाव्यानंतर अजितदादांच्या विमान अपघाताविषयी शंका उपस्थित केली जात आहे. असे असतानाच आता डीजीएसचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. या अहवालात अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत. या अहवालानुसार ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डन खराब झाल्याचे सांगण्यात आले आहे.

22 पानांचा अहवाल समोर  (Ajit Pawar Plane Accident Report)

या अहवालानुसार अपघातादरम्यान विमान अगोदर झाडावर आदळले. त्यानंतर विमान जमिनीवर आदळलेय पुढच्याच क्षणी विमानाचा मोठा अपघात झाला. समोर आलेला हा अहवाल 22 पानांचा आहे. अपघातानंतर विमानाचा स्फोट झाला. या स्फोटानंतर उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाले असे या अहवालानुसार समोर आले आहे. याच अहवालात हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे, तर हवामान, पायाभूत सुविधा, ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडलेल्या तात्पुरता निष्कर्ष काढण्यात आला आहे. अपघाताचे अंतिम कारण CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होणार आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला ? कारण काय ? (Ajit Pawar Plane Accident Report)

अजितदादांच्या विमान अपघाताची काही संभाव्य कारणं या प्राथमिक अहवालात सांगण्यात आली आहेत. यामध्ये VFR minima पेक्षा कमी दृश्यमानता, अनकंट्रोल्ड एअरफिल्डची अपुरी पायाभूत सुविधा, टेबल -टॉप रनवे तसेच फिकट मार्किंग, मानवी घटक दृश्य भ्रम , MET माहितीची मर्यादित अचूकता अशी काही या अपघाताची कारणं आहेत. विमानतळावर रनवे मार्किंग फिकट फिकट होती. सोबतच रनवेवर सैल खडी, पुरेशी कुंपण/ सीमा भिंत नाही असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

विमानाने तत्काळ नियंत्रण गमावले ( Ajit Pawar Plane Accident Report )

यासह विमानात VIP / चार्टर जेटसाठी आवश्यक असलेली मूलभूत सुरक्षा व नेव्हिगेशन सुविधाही बारामतीच्या विमानतळावर अपुरी आहे. विमानाने तत्काळ नियंत्रण गमावल्याचाही संकेत या तात्पुरत्या अहवालात देण्यात आला आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!