Ajit Pawar Election manifesto : विकास हा पर्यावरणाचं नुकसान करून होणार नाही. नाले, ओढे, ड्रेनेज स्वच्छ करणं आणि हरित क्षेत्रांचं संरक्षण करणं, अतिक्रमण रोखणं, पूर व प्रदूषणावर दीर्घकालीन उपाय करणं, पर्यावरणाशी समतोल राखणं हाच विकासाचा खरा मार्ग आहे. असे अजित पवार म्हणाले.
पुणे : 10/01/2026
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा प्रस प्रसिद्ध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Election manifesto) यांनी पुणेकरांना मोठी आश्वासने दिली आहेत. राष्ट्रवादीने पुणेकरांना मोफत मेट्रो आणि बसच्या मोफत प्रवासाचे आश्वासन दिले आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे पुणेकरांचे पेट्रोलचे दररोज साडेसात कोटी रुपये वाया जातात.
तर वर्षाला दहा हजार कोटी पेट्रोलसाठी वाया जातात. पण मेट्रो आणि बस प्रवास मोफत झाला तर रस्त्यावरील वाहने कमी होतील, यातून पुणे प्रदुषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल करेल. हेच पैसे मेट्रो आणि बससाठी वापरता येतील, हे मी अनेक तज्ञांशी बोलून मी सांगत आहे, असा प्लॅन अजित पवार यांनी सांगितला आहे. तसेच आगामी निवडणुकीत पुणे महापालिका आमच्या ताब्यात दिली तर मी मोफत मेट्रो करून दाखवेन, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
Table of Contents
आम्ही पुणेकर असल्याने…. (Ajit Pawar Election manifesto)
आम्ही पुण्यात रहात असल्यामुळे आम्हालाही पुणेकरांबद्दल जिव्हाळा आहे. बाहेरचे कोणी आले तर ते तेवढ्यापुरतेच येतील त्यामुळे आम्हालाच संधी द्या, असेही अजित पवारांनी म्हटलं आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी विविध विकासात्मक आश्वासने दिली आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या सोयी-सुविधांवर भर देत त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
अजित पवार यांनी मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवा सुरू करण्याचे अश्वासन दिले आहे. तसेच 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यात येणार असून, ‘ टँकरमुक्त पुणे’ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
शहरातील अपूर्ण असलेले ‘मिसिंग लिंक’ रस्ते पूर्ण करण्यात येणार असून, कचऱ्याचे 100 टक्के वर्गीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. आरोग्य सुविधांच्या दृष्टीने वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यासह टेलिमेडिसिन सुविधा उपलब्ध करून आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय, गुंठेवारी नियमितीकरणाची प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण केली जाणार आहे, 150 मॉडेल शाळांना मंजुरी देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. या घोषणांमुळे पुणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजित पवार यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर जाहीरनाम्याचा पाया दिला आहे (Ajit Pawar Election manifesto)
पाच कामं – पक्का वादा या घोषवाक्यासह पुण्याच्या विकासाचे काही मुद्दे देण्यात आले आहेत. ” गेल्या दहा वर्षांपासून पुणे शहर ज्या ” अलार्म चा आवाज एकत आहेत, त्यामध्ये पाणी टंचाई, वाढती वाहतूक कोंडी, ढासळती आरोग्य सेवा, पावसाळ्यातील पुरस्थिती आणि वाढतं प्रदुषण यांचा समावेश आहे. या सर्व प्रश्नांना ठोस उत्तर देणारा हा जाहीरनामा आज पत्रकार परिषदेत माध्यमांतून पुणेकरांसमोर मांडला. हे केवळ घोषणा पत्र नाही, तर जबाबदारी स्वीकारणारा दस्तऐवज आहे.”
काय म्हणाले अजित पवार ? (Ajit Pawar Election manifesto)
अजित पवार म्हणाले, आज मी नेता म्हणून नाही, तर पुणेकर म्हणून बोललो. कारण जिथं आपलेपण असतो. तिथं कारणं दिली जात नाहीत. तिथं जबाबदारी घेतली जाते. गेल्या सहा महिन्यांत वॉर्डनिहाय सर्वेक्षण, पुणेकरांशी तेच संवाद आणि त्यांच्या रोजच्या समस्या समजून घेत हा ठोस वचनांचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
“पाच कामं – पक्का वादा” (Ajit Pawar Election manifesto)
- दररोज नळाद्वारे, पुरेशा दाबासह पाणीपुरवठा. टँकर माफियांवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही. पाण्याची गळती थांबवून पाईपलाईन उन्नतीकरण आणि वेळेत दुरूस्त्या करणार.
- रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणार. मिसिंग लिंक प्रकल्प आणि विकास आराखड्यातील रस्ते ठराविक कालमर्यादेत पूर्ण कऱणार. नव्यानं समाविष्ट गावांमध्येही शहरमानकांनुसार रस्ते उभारणार.
- पुणे खड्डेमुक्त शहर करणार. खड्डे बुझवण्यासाठी कंत्राटदाराला वेळेची मर्यादा राहणार. कामाकडे दुर्लक्ष केल्यास दंड आणि संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार. टिकाऊ रस्ते उभारण्याची जबाबादारी कंत्राटदाराची राहणार.
- स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन कामकाज नीट होणार. आज निर्माण होणाऱ्या 980 MLD सांडपाण्याच्या प्रक्रिया क्षमतेतील तफावत भरून काढत नद्यांमध्ये जाणारं प्रदुषण थांबवणार. स्वच्छता ही मोहीम नव्हे, तर दररोजच्या कामातील व्यवस्था बनणार.
- आरोग्यसेवा सुलभ आणि परवडणारी होणार. वॉर्डनिहाय दवाखाने, सुधारित व नवीन रूग्णालये, खाटांची वाढ, मातृसेवा, कर्करोग उपचार, बर्न वॉर्ड ICU, टेलिमेडिसिन आणि गरिबांसाठी विमा सहाय्य सेवा उपलब्ध राहणार.
विकास हा पर्यावरणाचं नुकसान करून होणार नाही. ओढे, नाले, ड्रेनेज स्वच्छ करणे, आणि हरित क्षेत्रांचं संरक्षण करणं, अतिक्रमण रोखणं, पूर व प्रदूषणावर दीर्घकालीन उपाय करणं, पर्यावरणाशी समतोल राखणं हाच विकासाचा खरा मार्ग आहे. व्यवस्था करताना सन्मान आणि स्थैर्य महत्त्वाचं आहे. पुनर्वसन सन्मानानं झालं पाहिजे. उपजिविकेचं संरक्षणं केलं गेलं पाहिजे. दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी मोफत PMPML बस प्रवास, मोफत मेट्रो प्रवास, छोट्या घरांसाठी शून्य मालमत्ता कर सवलत आणि शिक्षण थांबू नये म्हणून मोफत टॅब दिले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आणि कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना 5 लाख रूपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज, स्वाभिमानानं उपजिविकेसाठी सहाय्य केलं जाणार आहे.
शिक्षण हा पाया आहे. म्हणूनच 150 “पुणे मॉडेल स्कूल” उभारणार. जागतिक दर्जाचं सार्वजनिक शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुणवत्तेची हमी देणार. आज 90 टकके ऑनलाईन शिकू इच्छितात. त्यामुळे डिजिटल शिक्षणासाठी मोफत टॅब अत्यावश्यक आहेत.
हा जाहिरनामा पुढील पाच वर्षांसाठी आहे. पूर्वी दिलेल्या जबाबदाऱ्या जशा पूर्ण केल्या, तसाच पुण्याची दिशा बदलण्याचा हा संकल्प आहे. हा जाहीरनामा कौतुकासाठी नाही, मोजमापासाठी आहे. दररोज पाणी नाही, रस्ते खराब झाले, आरोग्यसेवा मिळाली नाही किंवा प्रदुषण वाढलं, तर आम्हाला जाब विचारा. ही जबाबदारी आम्ही स्विकारतो. मी हा जाहीरनामा वचन देणारा म्हणून नाही, जबाबदारी म्हणून स्विकारणारा पुणेकर म्हणून पुण्यासमोर ठेवला आहे.