Ahmedabad Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी येथे काल झालेल्या एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. अहमदाबाद एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच हे विमान मेघानी परिसरातील नागरी वस्तीतील इमारतीवर कोसळले. यात तब्बल 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या सर्व मृतांच्या कहान्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या आहेत.
अहमदाबाद : 2025-06-13
अहमदाबादमधील विमान अपघातात महाराष्ट्रातीलही काही प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. मुंबईमधील गोरेगावच्या एका कुटुंबावर या अपघाताने मोठा आघात केला आहे. गोरेगावचे जावेद अली , त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले यांचा अपघातात मृत्युू झाल्याती बातमी आहे. जावेद अली हे गेल्या 12 वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या आईची तब्येत बरी नसल्याने, तिची भेट घेण्यासाठी ते कुटुंबासह 7 दिवसांच्या सुट्टीवर मुंबईत आले होते. काल पुन्हा ते लंडनला जात असताना या अपघातात सापडले. आणि संपूर्ण कुटुंबच नाहीसे झाले.
Leave a Reply