Air India Plane Crash

Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर भारतीय सेनेचा 130 जवान मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. या सेनेच्या फौजेमध्ये इंजिनियर, डॉक्टर, अग्निशमन दलांची टिम आणि प्रोवोस्ट स्टाफ सहभागी आहे. सैनिकी हॉस्पिटलही त्यासाठी सज्ज आहे. 

अहमदाबाद : 2025-06-12

गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातातील दुर्घटनेमुळे देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घेटनेनंतर भारतीय सैन्याने सगळी धुरा सांभाळत परिस्थिती हातात घेतली. सुमारे 130 सैनिकांची तुकडी मदतकार्यात गुंतली आहे. या अपघाताची तिव्रता भयानक आहे. त्यामुळे सैन्याने फक्त इंजिनियर किंवा डॉक्टरांची टिमच सज्ज केली नाही. तर अग्निशमन दलांतील आणि साईट प्रबंधन विषयातील तज्ञांना ही या टिममध्ये सामिल करण्यात आले आहे. मातीच्या ढिगाऱ्यांमध्ये अडकलेल्या जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यात सैन्याचे जवान कसून प्रयत्न करत आहेत. 

सेनेच्या जवानांकडे मोठ्या प्रमाणातील अत्याधुनिक उपकरणे आहेत, ज्यामुळे मदतकार्य सोपे होत आहे. या उपकरणांमध्ये जेसीबी मशीन, फायरफायटिंग उपकरणे,डॉक्टरांसाठी मेडिकल स्टाफ आहे. सेनेच्या इंजिनियर विभागाकडून ढिगाऱे हलवण्याचे काम वेगाने केले जात आहे. स्थानिय प्रशासनाला हाती धरून सैन्याकडून हे बचावकार्य सुरू आहे. सैन्यामुळे इतक्या गंभीर घटनेला सावरण्यासाठी मदत होते आहे. त्यासाठी सैनिकी हॉस्पिटल सज्ज केले आहेत. 

 

130 सैनिकांची टिम सज्ज 

घटनेनंतर त्वरीत भारतीय सेनेकडून सुमारे 130 सैनिकांची तुकडी मदतकार्यासाठी सज्ज झाली. या सर्वांना विशेष HADR ( ह्युमेनिटेरियन असिस्टंट एंड डिजास्टर रिलिफ ) ऑपरेशनच्या अंतर्गत ही टिम सज्ज करण्यात आली आहे. या टिमच्या इंजिनियर टिमकडून जेसीबीच्या मदतीने ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून त्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढता येईल. अहमदाबाद मधील सैनिकी रूग्णालय पुर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहे. मात्र या गंभिर अपघातात सर्वच प्रवासी आणि स्टाफ मिळून 242 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!