leopard attack बिबट्या हल्ला

 Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील नीळवंडी रस्त्यालगतच्या जाधववस्तीवर शनिवारी दुर्वैवी घटना घडली. एका 9 वर्षीय बालकाचा बिबट्याने (Leopard Attack) केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. 

अहिल्यानगर : 2025-06-01

अहिल्यानगर ( Ahilyanagar) जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील निळवंडी रस्त्याच्यालगत असणाऱ्या जाधव वस्तीवर एका 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. दबा धरून बसलेल्या बिबट्याने  (Leopard Attack) 9 वर्षीय रूद्र अमोल जाधव या बालकावर जीवघेणा हल्ला केला. गेल्या एक महिन्यातील हा दुसरा हल्ला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. बालकाच्या मृत्यूने ग्रामस्थांमध्ये संताप आणि आक्रोश व्यक्त होत आहे.

शनिवारी रात्री सुमारे 9 वाजता रूद्र आपले आजोबा दत्तू जाधव यांच्यासह फेरफटका मारायला बाहेर पडला होता. तेव्हाच झाडाझुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. लहानग्या रूद्रवर झडप घालून, त्याला ओढत जवळच असणाऱ्या नाल्यात घेऊन गेला.

रूद्रचे आजोबा दत्तू जाधव यांनी आरडोओरडा केला. त्यानंतर शेजारी धावून आले. सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी बिबट्याचा पाठलाग केला. लोकांची झुंड बघून बिबट्या रूद्रला सोडून, जंगलाकडे पसार झाला. त्यानंतर रूद्रला तत्काळ ग्रामीण रूग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेनंतर रात्री उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन 

बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या, रूद्रच्या मृत्यूमळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे. शनिवारी रात्री 11 वाजेपर्यंत नाशिक-कळवण-गुजरात मुख्य मार्गावर नाकाबंदी करून लोकांनी, आंदोलन करत संताप व्यक्त केला. या आंदोलनात माजी आमदार धनराज महाले आणि स्थानिक लोकप्रतिनीधींनी सहभाग घेतला. या आंदोलनाने वाहतूक कोंडीमुळे, वाहतूक ठप्प झाली होती. 

ग्रामस्थांच्या मागण्या आणि आक्रोश 

  • प्रशासनाने तत्काळ कारवाई करत, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काहीतरी व्यवस्था कार्यन्वित करावी.
  • वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे  होणाऱ्या हल्ल्यांना पायबंद घालावा.
  • पीडित कुटुंबाला आर्थिक मदत आणि न्याय देण्यात यावा.
  • परिसरात वाढणाऱ्या वन्यजिवांच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेता, बालके आणि वृद्ध यांना सुरक्षा पुरवावी.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!