Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून करून मृतदेह नदीत फेकल्याचे कबुल केले.
संगमनेर : 10/12/2025
अहिल्यानगर जिल्ह्यामधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदाच्या आई-वडिलांनीच आपल्या तान्ह्या बाळाचा गळा घोटून हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर बाळाला मुळा नदीच्या पुलाखाली फेकून दिले. ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात घडली. 4 डिसेंबरला मुळा नदीच्या पुलाखाली तीन महिन्याच्या बाळाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांना तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.
काय आहे या हत्येमागचे कारण ? (Ahilyanagar Crime)
4 डिसेंबर रोजी संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात मुळा नदीच्या पात्रात एका बाळाचा मृतदेह तरंगतांना दिसल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. पोलिसांनी या बाळाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि घारगाव पोलीस याप्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.
बाळाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली कार ही जालन्याच्या भोकरदान तालुक्यातील आव्हाना येथील असल्याचे समोर आले होते. पोलीस पथक भोकरदान येथे जाऊन आरोग्य केंद्र, आशा सेविका आणि गोपनिय माहितीचे समोर आले होते. पोलिसांनी या कारच्या मालकाकडे जाऊन चौकशी केली.
त्यानंतर या बाळाच्या आई-वडिलांकडे संशयाची सुई गेली. पोलिसांनी बाळाचे वडील प्रकाश पंडित जाधव (वय 37, रा. भिवपूर, ता.भोकरदान, जि.जालना) आई कविता प्रकाश जाधव ( वय 32) तसेच गाडी चालक हरिदास गणेश राठोड (वय 32, रा.आव्हाणा, ता. भोकरदन, जि.जालना) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करत त्यांनी या बाळाची हत्या केल्याचे सांगितले. बाळाचे नाव शिवांश प्रकाश जाधव असे.
का केली माता-पित्यानी हत्या ? (Ahilyanagar Crime)
शिवांशची हत्या तिच्या आई-वडिलांनी केल्याची कबुली दिली. शिवांशला असाध्य आजार होता. त्याला अनेक डॉक्टरांना दाखवण्यात आले. परंतु बहुतेक डॉक्टरांनी हे बाळ पूर्ण बरे होणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे आजाराने ग्रस्त असलेल्या बाळाचाच गळा दाबून त्याचा खून केला गेला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात मुळा नदीच्या पुलाखाली या बाळाच्या अंगावरील कपडे काढून त्याला नग्नावस्थेत नदिच्या पुलाखाली फेकण्यात आले आणि आई-वडिल पसार झाले.
शिवांशची हत्या केल्यावर शिवांशच्या आईने , त्याचे जालना येथे ऑपरेशन झाल्याचे सांगून नातेवाईकांमध्ये अफवा पसरवली.
Leave a Reply