CJP Protest Demands Winसीजेपीच्या 3 पैकी 2 मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा निर्णय प्रलंबितच, CJP चा दावा.

CJP Protest Demands Win : कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने दावा केला आहे की, त्यांच्या दोन प्रमुख मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. मात्र केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबतच्या निर्णयासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतचा अवधी मागितल्याचे CJP ने म्हटले आहे.

दिल्ली : 24-07-2026

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतल्यानंतर उपोषण संपवले आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) नेतृत्वाखालील ( CJP Protest Demands Win ) सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वांगचुक 28 जूनपासून उपोषणाला बसले होते. त्यांनी सांगितले की, 26 दिवसांनंतर त्यांनी आपले उपोषण संपलले आहे.

दरम्यान, कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके म्हणाले की, ” सोनम वांगचूक यांनी उपोषण संपवल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. मात्र जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन शांततेत सुरूच राहील”.

केंद्र सरकारकडून चर्चेची दुसरी फेरी पूर्ण ( CJP Protest Demands Win )

कॉक्रेच जनता पार्टी (CJP) आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेत महत्त्वाची प्रगती झाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. आज झालेल्या दुसऱ्या फेरीच्या बैठकीत CJP च्या शिष्टमंडळांने केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ.जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. जवळपास एक तास चाललेल्या बैठकीत आंदोनलाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा कऱण्यात आली.

बैठकीदरम्यान CJP ने केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. पक्षाच्या म्हणण्यानुसार सरकारने त्यापैकी दोन मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या मान्य केल्या आहेत. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही.

CJP ने स्पष्ट केले की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पक्ष ठाम असून ही मागणी मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही. सरकारने या विषयावर निर्णय घेण्यासाठी उद्या (दुपारपर्यंत) वेळ मागितला आहे. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारची अधिकृत भूमिका CJP ला कळवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का ? ( CJP Protest Demands Win )

या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर, उद्या धर्मेंद्र प्रधान राजीनामा देऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. दिल्लीतील राजकीय वर्तुळात हीच चर्चा सुरू आहे. याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृक घोषणा कऱण्यात आली नाही. दरम्यान, CJP ने सरकारच्या अंतिम निर्णयाची प्रतिक्षा कऱण्याचा निर्णय घेतला असून, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाईल, असेही पक्षाकडून स्पष्ट कऱण्यात आले आहे.

CJP पक्षाने केले दावे ( CJP Protest Demands Win )

कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेनंतर पक्षाने काही दावे केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतची मुदत मागितली आहे. रांका यांनी पत्रकारांशी बोलताना सरकार धर्मेद्र प्रधान यांना लवकरच पदावरून दूर करेल, अशी आशा व्यक्त केली . त्यांनी सांगितले की, सरकारसोबत झालेल्या चर्चेत काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, CJP ने मांडलेल्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामध्ये NEET प्रकऱणानंतर आत्महत्या केेलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक नुकसानभरपाई देणे आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांविरूद्ध दाखल कऱण्यात आलेले गुन्हे तसेच इतर कायदेशीर खटले मागे घेणे या मागण्यांचा समावेश आहे. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!