Naredra Jadhav : हिंदी भाषेच्या मुद्दावरून वातावरण तापल्यानंतर सरकारने दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सरकारने समिती स्थापन केली आहे. त्याचे अध्यक्ष असणाऱ्या आणि पुणे विद्यापिठाचे माजी कुलगुरू असणाऱ्या नरेंद्र जाधव यांनी त्यांचे मत मांडले आहे.
मुंबई : 02/07/2025
गेले काही महिने राज्यात प्राथमिक शाळांना हिंदी विषय सक्तीचा करावा का ? यावरून बराच वाद सुरू आहे. त्याविरोधात अनेक संघटना आणि राजकीय पक्ष यांनी विरोधी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर येत्या 5 जुलैला भव्य मोर्चा मनसे आणि उद्धव ठाकरे गटाकडून काढण्यात येणार होता. मात्र त्याआधीच सरकारने आपला निर्णय मागे घेत, त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केले आहेत. मात्र सरकराने त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतरच आता त्रिभाषा सूत्राबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
ही समिती स्थापन करण्यात आल्यानंतर आता नरेंद्र जाधव यांची या सर्व बाबतीत पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले आहेत नरेंद्र जाधव ?
अध्यक्षांच्या नावाची घोषणा झालेली आहे, समितीत अनेक लोक असणार आहेत. तीन महिने आमच्या हातात आहे. माशलेकर समितीचा अभ्यास करणार आहोत. विरोध करणाऱ्या नेत्यांची बाजू देखील समजून घेणार आहोत. अजून खऱ्या अर्थानं सुरूवात झालेली नाही. मराठीला प्राधान्य असायला हवे, असे जाधव यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या विषयी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, मी राज ठाकरे यांचं म्हणणं एकुण घेणार आहे. त्रिभाषा सूत्रावर अभ्यास करत असताना, नेत्यांचं, तज्ञांचं आणि पालकांचं मत विचारत घेतलं जाईल, आम्ही वेळेत अहवाल सादर करू असं जाधव यांनी म्हटलं आहे.
Leave a Reply