Beed News, Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. ही सुनावणी आज विशेष न्यायलयात होणार होती. आता या केसची सुनावणी 24 जून रोजी होणार आहे.
बीड : 2025-06-17
जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची (Santosh Deshmukh Murder Case)आज होणार असलेली सुनावणी स्थगित करण्यात आली. आज (17 जून) ला होणारी सुनावणी आता 24 जून ला होणार आहे. विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुटीवर असल्याकारणाने सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.
ही सुनावणी विशेष मोक्का न्यायलयात होणार होती. वाल्मिक कराडच्या विरोधात असणाऱ्या आरोपांना पुष्टी देणारे युक्तिवाद होतील अशी अपेक्षा होती. त्याबाबत महत्त्वाचे मुद्दे चर्चीले जातील असे बोलले जात होते. परंतु न्यायाधीशांच्या अनुपस्थितीतमुळे कार्यवाही करण्यात आली नाही. त्यासाठी आता 24 जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case)
बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हेलावला. या प्रकरणात विल्मिक कराड आणि अन्य आरोपींच्या विरोधात मोक्का कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजुनही फरार आहे. या दरम्यान वाल्मिक कराडचे वकिलांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विल्मिक कराड निर्दोष असल्याने त्याला सोडून द्यावे असा अर्ज केला आहे. या प्रकरणाची मागची सुनावणी 3 जूनला झाली होती.
या सुनवणीला सरकारी वकिल उज्जव निकम यांची उपस्थिती अनिवार्य होती. मागच्या सुनवाणीच्या वेळी आरोपी वाल्मिक कराडच्याविरोधातील आरोपांच्या संदर्भात आणखी सबळ पुरावे देण्यात आले होते. वाल्मिक कराडच्या वकिलांनी अशी मागणी केली होती की, डिजिटल पुरावा देण्यात यावा. आज त्यासंबंधीचा युक्तिवाद होणार होता. मात्र न्यायाधिश सुट्टीवर असल्याने आजची सुनवाणी झाली नाही.
संतोष देशमुख यांचा मुलगा सैनिकी शाळेत घेणार शिक्षण
बीड जिल्ह्यातील मसाजोग ते सरपंच संतोष देशमुख यांची क्रुरपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे कुटुंबिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. तेव्हा फडणवीस यांनी विराज देशमुख याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. विराज देशमुख आता सांगली जिल्ह्यातील रेथेधरन स्थित सैनिकी शाळेत शिक्षण घेणार आहे. यासंबंधीचे पत्र संतोष देशमुख यांचे भाऊ महेश देशमुख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे. यावेळी औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यु पवार आणि आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते.
Leave a Reply