मुंबई : 2025-05-15
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navari Mile Hitlerla ) ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. झी मराठी वाहिनीवर अनेक नव्या मालिका, रिॲलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे वाहिनीवरीक अनेक लोकप्रिय मालिका निरोप घेत आहेत. गेल्या दोन महिन्यात झी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’या काही लोकप्रिय मालिकांनी निरोप घेतल्याचे पहायला मिळाले. आणि आता येत्या काही दिवसात ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navari Mile Hitlerla ) ही मालिका संपणार आहे.
गेल्या वर्षभरापासून एक वेगळा विषय घेऊन ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाली होती. एजे म्हणजे अभिराम जहागिरदार आणि लिला या जोडीच्या प्रेमाच्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि मालिकेच्या वेगळ्या नावाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. मात्र मालिकेतील कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर शुटिंगच्या अखेरच्या दिवसांच्या पोस्ट टाकल्याने, आता ही मालिका बंद होणार असल्याचे निश्चिच समजले जातच आहे. देवमाणुस या लोकप्रिय मालिकेचा पुढील अध्याय लवकरच येत असल्याने या मालिकेला निरोप देत असल्याते समजते.
या मालिकेच्या माध्यमातून वल्लरी विराज हा नवा चेहरा मालिकाविश्वात बघायला मिळाल. तसेच राकेश बापट सारखा हिंदी चित्रपटांद्वारे प्रसिद्ध झालेला चेहरा बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या शिवाय शर्मिला शिंदे, सानिका काशिकर, भूमिजा पाटील, अलापिनी निसाळ, ज्येष्ठ अभिनेत्री भारती पाटील, माधुरी भारती या कलाकारांच्या यात महत्त्वाच्या भूमिका होत्या.
Leave a Reply