IPL 2025

Breaking ! IPL 2025 Adjourned : भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर BCCI ने IPL केले स्थगित

क्रीडा : 2025-05-09

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता वाढतच चालला आहे. हा तणाव आणि युद्धसदृश्य पद्धती पहाता बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयपीएल (IPL) 2025 च्या स्पर्धेला स्थगिती देण्यात आली आहे. बुधवारी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने या हल्ल्यांना परतून लावले असले, तरी येत्या काळातील परिस्थिती आणखी तणावपूर्ण होई शकेल या भितीने, सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल( IPL 2025 ला ) स्थगिती देण्यात आली आहे. 

पहलगामयेथे पर्यटकांवर झालेला हल्ला आणि त्याला भारताने ऑपरेशन सिंदूर ने दिलेले प्रत्युत्तर यातून सध्या दोन्ही देशात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून आयपीएलला अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली आहे. धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात या सीझनमधील 58 वी मॅच सुरू होती. ही मॅच अर्ध्यातच थांबवण्यात आली.सध्या देशात असणाऱ्या परिस्थितीचा विचार करता, केंद्र आणि सर्व फ्रँचायझीचे मालक आणि भागधारक यांच्याशी विचारविनिमय करून हा स्पर्धा स्थगितीचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्यातरी पुढील मॅचला स्थगिती देण्यात आली आहे. उर्वरित मॅच पुन्हा कधी होणार, कशा होणार याचा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. 

आणखी 16 मॅच बाकी 

आयपीएल 2025 च्या या सीझनमध्ये एकुण अत्तापर्यंत 57 सामने खेळवण्यात आले आहे. 58 वा सामना मध्येत स्थगित करण्यात आला. एकुण 74 सामने खेळवले जाणार होते आणि त्यानंतर 25 मे ला या स्पर्धेचा समारोप होणार होता. सध्या सामने स्थगित केल्यामुळे उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक पुढील काळात योग्यवेळ आल्यावर ठरवण्यात येईल. 

2021 मध्येही आली होती स्थगिती 

या आधी आयपीएल सामने स्थगित करण्याची वेळ 2021 मध्येही आली होती. त्यावेळी कोरोना मुळे आयपीएलचे सामने तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यानंतर परिस्थिती थोडी निवळल्यावर त्याचे उर्वरित सामने युएईमध्ये जाऊन खेळवण्यात आले होते. 

परदेशी खेळाडूंची सुरक्षा 

गेल्या काही दिवसापासून असे सांगण्यात येत होते की, आयपीएल मध्ये खेळणाऱ्या परदेशातील अनेक खेळाडूंनी परत आपल्या मायदेशी जाण्याचा विचार बोलून दाखवला होता. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय ने या परदेशी खेळाडूंना शक्य तितक्या लवकर मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूंसह त्यांचे कुटुंबसुद्धा भारतात असल्याने त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आणखी महत्त्वाचा ठरतो. देश युद्धात असताना देशात क्रिकेट सुरू रहाणेही योग्य दिसणार नाही, असे म्हणत बीसीसीआयकडून आयपीएल मॅच स्थगित करण्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. 

Leave a Reply

Releated Posts

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP School 25 students Visit Nasa And 12 Days Visited Various Educational center

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे…

ByByJyoti Bhalerao Dec 4, 2025

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against Shehbaz Sharif And Asim Munir

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025