Indrayani River

Indrayani River Accident : आज रविवारी ( 15 जून ) पुण्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपयांच्या मदतीची घोषणा कऱण्यात आली आहे. 

पुणे : 2025-06-15

रविवारी दुपारी मावळ येथील इंद्रायणी नदीवर पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले. येथील नदिवरील पूल अचानक कोसळला आणि अनेकजण वाहून गेले. या घटनेत 40 पेक्षा जास्त लोकं वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. पाण्यात वाहून जाणाऱ्या पर्यटकांपैकी 38 जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मावळमध्ये असलेल्या कुंड मळ्यात ही घटना घडली आहे.

आज रविवार असल्यानं या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. जेव्हा ही घटना तेव्हा अंदाजे 50 च्या आसपास पर्यटक या पूलावर होते. काही जणांनी या पूलावर बाईक देखील घातली. वजन वाढल्यामुळे हा पूल कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. अशी महिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे. 

ही दुर्घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस विभाग आणि महसूल विभाग घटनास्थळी हजर झाले. तातडीने बचावकार्य सूरु करण्यात आले.

काय म्हणाले जिल्हाधिकारी ?

आतापर्यंत 38 लोकांनीा वाचवण्यात यश आले आहे. काहींना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे. तर या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. याठिकाणी आधीच बंदीचे आदेश लागू केले होते. दहा दिवसांपूर्वीच त्या संदर्भात आपण आदेश जारी केले होते. पर्यटकांनी अशा धोक्यांच्या जागी जाऊ नये असं सांगण्यात आलं होतं. ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे पाच लाखांची मदत केली जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रशासनाला आदेश दिला आहे. तसेच जे लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुर्णपणे मोफत उपचार केेले जातील, अशी माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!