Translate :

Sponsored

Vishrantwadi Traffic Issue, Good News, 2026 : विश्रांतवाडी, शास्रीनगरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार, महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश : The Pune Muncipal Commissioner Reviewed The Projects in the Vishrantwadi, Shastrinagar

विश्रांतवाडी, शास्रीनगरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार, महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश.

Vishrantwadi Traffic Issue : विश्रांतवाडी, शास्रीनगर येथील ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल प्रकल्पाची कामे मुदतीत पूर्ण करा असे निर्देश महापालिका आयुक्त नवल किशोरकदम यांनी दिले आहेत. या आदेशामुळे आता या दोन्ही भागात होणारी दररोजची वाहतूक कोंडी कमी होईल, अशी चिन्हे आहेत.

पुणे : 14-08-2026

गेले काही महिने शहरातील विश्रांतवाडी ( Vishrantwadi Traffic Issue ) आणि शास्रीनगर परीसरात सतत वाहतूक कोंडी होत आहे. येथे ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपूल प्रकल्पाची कामे मुदतीत पूर्ण करा असे निर्देश पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेतय शास्रीनगर येथील काम मार्च 2027 अखेर तर विश्रांतवाडी येथील काम यावर्षीच्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण कऱण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

शास्रीनगर चौक येथील प्रस्तावित ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल प्रकल्प, विश्रांतवाडी (मुकुंदराव आंबेडकर चौक-विश्रांतवाडी जंक्शन) येथील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पाच्या कामाचा आयुक्तांनी गुरूवारी आढावा घेतला. या परिसरातील वाहतूक कोंडी कमी कऱण्याच्या दृष्टीने प्रस्तावित प्रकल्पांच्या कामास गती देऊन आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण कऱण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारास दिल्या.

आगाखान पॅलेस ते गुंजन चौक रस्ता ( Vishrantwadi Traffic Issue )

 सध्या नगर रोडवरून येणारी वाहतूक गोल्फ चौकमार्गे मुंबईच्या दिशेने तसेच कल्याणीनगर व गुंजन चौकाच्या दिशेने जाते. या मार्गांवरील वाहतुकीचा मोठा भार शास्रीनगर चौक परिसरात येत असल्याने चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे दिसत होते. होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर उपाययोजना कऱण्यासाठी आगाखान पॅलेस ते गुंजन चौक या दिशेने सुमारे 750 मीटर लांबीचा सहा लेनचा ग्रेड सेपरेटर प्रस्तावित आहे.

तसेच आगाखान पॅलेस ते गोल्फ चौक या दिशेने सुमारे 700 मीटर लांबीचा चार लेनचा उड्डाणपूल प्रस्तावित असून, या दोन्ही प्रकल्पांमुळे शास्रीनगर चौकातील वाहतूक सुरळीत होणार आहे.

विश्रांतवाडीतील अडचण एका महिन्यात दूर होणार ( Vishrantwadi Traffic Issue )

विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौक येथील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाच्या पाहणीदरम्यान आळंदी रस्ता ते विमानतळ रस्ता या दिशेतील ग्रेड सेपरेटरच्या कामामध्ये श्री रामश्वेरशेठ गणपती मंदिराचा काही भाग तसेच श्री महालक्ष्मी देवी मंदिरामुळे निर्माण होणारा अडथळा आयुक्तांना जागेवर समजावून सांगण्यात आला. सदर अडथळ्यांमुळे ग्रेड सेपरेटरचे काम नियोजित गतीने झाले नाही.

हा विषय एक महिन्यात निकाली काढण्याच्या सुचनाही आयुक्यांनी दिल्या आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड (एसआरए), बांधकाम विकास विभाग, नगर रोड क्षेत्रिय कार्यालय, अतिक्रमण विभाग तसेच संबंधित जागामालक यांची संयुक्त बैठक व संयुक्त जागा पाहणी आयोजित कऱण्याच्या सुचना दिल्या. प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात चौकातील वाहतूक वळविल्यानंतर चौक व आळंदी रस्ता बाजूकडील उड्डाणपुलाचे काम तात्काळ हाती घेण्याच्या सुचना संबंधित अधिकारी व कंत्राटदारास देण्यात आले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored