Translate :

Sponsored

Ajit pawar News, Big News, 2026 : अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी; अहवाल लवकर यावा; देवेंद्र फडणवीसांची अमित शहांसमोर मागणी

अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी; अहवाल लवकर यावा; देवेंद्र फडणवीसांची अमित शहांसमोर मागणी.

Ajit pawar News : पुणे जिल्हा परिषद परिसरातील यशवंतराव चव्हाण भवन येथे दिवंगत उपुमख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कऱण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाची मागणी केली.

पुणे : 16-11-2026 

अजित पवारांच्या (Ajit pawar News)  अपघाताचा अहवाल लवकर यावा यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली आहे. अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी. कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करणार असे महत्त्वाचे वक्तव्य देवेद्र फडणवीस यांनी केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर मुख्यमंत्री फडणवीस ही मागणी केली आहे.

पुणे जिल्हा परिषद परिसरातील यशवंतराव चव्हाण भवन येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलें. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उपुमख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह अजित दादांच्या आठवणींना उजाळा देत सारेच भावुक झाल्याचे पहायला मिळाले.

ज्या जिल्हापरिषदेसाठी अजितदादांनी आपले अवघे आयुष्य वेचलं त्याच पुणे जिल्हा परिषदेत आज अजितदादांच्या खऱ्या कार्याचे प्रमाणपत्र आहे. छत्रपती कारखान्यापासून, जिल्हा परिषद, खासदार, आमदार ह्या प्रवासात अजितदादांचे मातीशी असेलेले नातं बदललं नाही. जनसेवा, जनकल्याण, विकास, याबद्दल काम करणारे दादांचे नेतृत्व असल्याचे सांगत अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे बघायला मिळाले.

पुणे जिव्हा परिषद परिसरातील यशवंतराव चव्हाण भवन येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कऱण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजित दादांच्या आठवणींना उजाळा देत असताना भावुक झाल्याचे पहायला मिळाले.

जनसेवा, जनकल्याण, विकास, बद्दल कायम संघर्ष करणारे दादांचे नेतृत्व – सुनेत्रा पवार  (Ajit pawar News)

अजितदाद आणि अमितभाई यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध आपण पाहिले आहेत. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण अजितदादांचा वेगळाच होता. पंतप्रधान मोदीजी अजित दादांना दादाच म्हणत. दादांच्या कामांची खासीयत विषय मनात घेतला की त्याचा पाठपुरावा घ्यायचा आणि ते मार्गी लावायचाच, अशी होती. केंद्राकडे शेतकरी, सहकार, शिक्षणाबद्दल दादांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.

जनसेवा, जनकल्याण, विकासाबद्दल कायम संघर्ष करणारे नेतृत्व दादांचे होते. अमितभाईंच्या शुभहस्ते दादांच्या पुतळ्याचे अनावरण होणे याला एक वेगळे कारण आहे. दादांप्रती आपला स्नेह दाखवलात, त्याबद्दल धन्यवाद. मोदीसाहेबांच्या नेतृत्वात तीघेजण राज्याच्या विकासात रथ चालवत होते. पण दादांच्यानंतर सगळ्यांकडून मला पूर्वीपेक्षा जास्त सहकार्य मिळत आहे.

निर्मल ग्राम, संत गाडगे महाराज अभियानात काठेवाडीला मिळालेला सन्मान माझ्यासाठी वेगळाच आनंद देणारा होता. त्यासाठी काठेवाडी ग्रामस्थांसोबत अजितदादांचेही मोलाचे योगदान असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला.

एकनाथ शिंदे म्हणाले… (Ajit pawar News)

अजितदादा एका पुतळ्याच्या चौकटीत बसणारे व्यक्तिमत्व नाही. त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबादाऱ्या पार पडल्या. ते आमदार सात वेळा झाले, खासदारही झाले. उपमुख्यमंत्री सहाव्यांदा झाले. त्यांनी अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. ते विरोधी पक्ष नेतेही होते. त्यांचे कार्य डोंगरा एवढं होतं. परंतु आपल्याला काही गोष्टी पटत नसल्या तरी शेवटी मान्य कराव्या लागतात.

ज्या दिवशी 28 जानेवारीला ही दुर्घटना घडली तर तो दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता. मनाला वेदना आणि चटका लावून जाणारा तो दिवस होता. कोणाला विश्वासच नव्हता. परंतु शेवटी ईश्वरापुढे आणि नियती पुढे आपल्या सगळ्यांपुढे कोणाचं चालत नाही. वस्तुस्थिती मान्य करावी लागते. अजित दादांनी जे काम केलं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्यांनी ज्या वास्तू उभ्या केल्या त्या आपल्यासमोर आहे.

प्रत्येक गोष्टीवर त्याचं लक्ष असायचे. उद्धाटनाच्या वेळेस देखील त्यांची नजर असायची. कुठे कलर निघालाय, कुठे काय राहिले ते आवर्जून बघायचे कारण ज्या काही वास्तू उभ्या राहतात त्या जनतेला त्यातून न्याय मिळाला पाहिजे, यासाठी त्यांचा अट्टाहास असायचा. फणस काटेरी असतो पण आतून मधाळा असतो तसेच अजित दादा होते, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ? (Ajit pawar News)

अजितदादा आपल्यातून निघून गेले. त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्यावेळी आपल्या सर्वांच्या मनात आठवणींचं काहूर आहे. अजित दादांचं पुण्यावर किती प्रेम होतं हे सर्वांना ज्ञान आहे. महाराष्ट्रात दादांचे नेतृत्व होतंच, पण पुण्याबद्दल त्यांना विशेष संवेदना होत्या. अजित दादा एक कणखर, शिस्तबद्ध आणि दूरदृष्टी असलेला नेता अशा विविध विशेषण त्यांना देता येतील. दादांनी अनेक अर्थसंकल्प मांडले पण आर्थिकशिस्त कधी मोडू दिली नाही.

वेगवेगळ्या कामात पैसा लावताना, त्याची गुणवत्ता, क्वालिटी असली पाहिजे याकडे दादांचा आग्रह असायचा. कुठलीही गोष्ट थेट बोलणं राजकारणात कमी पहायला मिळते. राजकारणात कुणाला थेट बोलता येत नाही. दादांकडे हो आणि नाही असे दोनच शब्द होते. जे पटलं त्याला हो म्हणणारं आणि असे दोनच शब्द होते. जे पटलं त्या हो म्हणणार आणि मग ते काम करून घेण्यासाठी त्याच्या पाठीमागे उभं राहणार. पण जे नाही पटलं ते नाही म्हणणार.

असं सांगण्याची हिंमत असलेले अजित दादा एकमेव होते. त्यांच्याकडून खुप काम झालेलं पाहण्याची अपेक्षा होती. महाराष्ट्रात त्यांचं नेतृत्व बहरत होतं, अशावेळी अजितदादा आपल्यातून निघून गेले. त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्यावेळी आपल्या सर्वांच्या मनात आठवणींचं काहूर आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored