Translate :

Sponsored

Pune MLC Election Result Update, Big News, 2026 : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी; कॉंग्रेसचे जयंत आसगावकरांचा पराभव : Pune Teachers MLC Election Results 2026 kaustubh Gawade Wins Jayant Asgaonkar Defeated

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी; कॉंग्रेसचे जयंत आसगावकरांचा पराभव

Pune MLC Election Result Update : पुणे पदवीधर- शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आता हळूहळू जाहीर होत आहेत. पहिल्या फेऱ्यांनंतर दत्तात्रय सावंत तिसऱ्या क्रमांकावर होते. शिंदेसेनेचे पाठिंबा मिळालेले प्रा.सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. दुसऱ्या पसंतीच्या मताच्या मोजणीनंतर जयंत आसगावकर बाद झाल्याचे समजते. निकाल अधिक जाणून घेऊ.

पुणे : 28-10-2026 

राज्य विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाचे निकाल (Pune MLC Election Result Update) जाहीर होत आहेत. यावेळी या निवडणुकांमध्ये मोठा राजकीय बदल पहायला मिळत आहेत. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा दारूण पराभव झाला आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीदरम्यान ते बाद झाले. या निकालानंतर भाजपपुरस्कृत कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.

आमदार जयंत आसगावकर यांना दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत केवळ 8,965 मते मिळाल्यामुळे ते शर्यंतीतून बाहेर पडले.

भाजपपुरस्कृत कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर झाला आहे. आमदार जयंत आसगावकर यांना दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत केवळ 8,965 मते मिळाल्यामुळे ते शर्यतीतून बाहेर पडले.

भाजपपुरस्कृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी 18,385 मतांसह आपली भक्कम आघाडी कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची घोषणा ही फक्त आता एक औपचारिकता उरली आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाने पाठिंबा दिलेले सचिन सानप हे 11,983 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 23 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर काल निकाल जाहीर केले जाणार होते. पण गेल्या 24 तासांनंतर जयंत आसगांवकर यांचा पराभव झाला.

विजयासाठी किती मतांचा कोटा ? (Pune MLC Election Result Update)

पुणे शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत एकुण 1 हजार 675 मते बाद झाली, तर 51 हजार 511 मते वैध ठरली आहेत. या वैध मतांच्या आधारे विजयासाठी 25 हजार 756 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

हा कोटा कोणता उमेदवार पूर्ण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमधून आवश्यक कोटा पूर्ण न झाल्यास पुढील पसंतीच्या मतांच्या मोजणीची प्रक्रिया निकालावर परिणाम करणारी असेल.

पुणे पदवीधर मतदार संघातही चुरस (Pune MLC Election Result Update)

पुणे पदवीधर मतदारसंघात प्राथमिक अहवालांनुसार महाविकास आघाडीच्या हर्षदा जाधव आणि महायुतीच्या डॉ. स्मिता जाधव यांच्यात लढत आहे. मतमोजणीनंतर शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored