Devendra Fadanavis News : जालना जिल्हा भाजप नूतन कार्यालयाचा भूमिपुजन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी मोठी घोषणा केली. त्यांनी पुढच्या पिढीला दुष्काळाचं तोंडही पाहू देणार नाही अशी हमी दिली. त्यासाठी मराठवाड्यात कुठून आणि कसे पाणी आणण्यात येईल हे ही त्यांनी सांगितले.
जालना :14-08-2026
जालना जिल्हा भाजप नूतन कार्यालयाचा ( Devendra Fadanavis Jalana News ) भूमिपूजन तसेच शेतकरी भव्य मेळावा झाला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी दुष्काळमुक्त मराठवाड्याती घोषणा केली. त्यांनी मराठवाडा कसा दुष्काळ मुक्त करणारा हा फॉर्म्युलाही सांगितला. आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा आहे, ज्यावेळी एखादा व्यक्ती आपलं घर बांधतो तेव्हा कुटुंबाला आनंद होतो.
तोच आनंद आज भाजपच्या कार्यकर्त्याला होत आहे. कार्यकर्त्याच्या हक्काचं घर आज तयार होत आहे. अतिशय चांगला भूखंड पक्षासाठी निवडला. आज भाजप देशातल्या सगळ्यात मोठा पक्ष आहे. मोदींच्या नेतृत्वात आपला देश विकसीत होत आहे. 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचा काम झालं. परिवर्तन कऱण्याचं काम मोदीजींनी केलं, वेगवान जीवन आपण जगतोय. शिक्षणाची नवीन दालनं उघडत आहे असे फडणवीस म्हणाले.
दुष्काळमुक्त मराठवाड्याची घोषणा ( Devendra Fadanavis Jalana News )
मराठवाड्याला नेहमीकरीता दुष्काळमुक्त कऱण्याचे काम आपण करत आहोत. एकीकडे कोल्हापूर, सांगलीचे पूराचे पाणी हे उजणीच्या धरणात आणणार आहोत. पश्चिम वाहिनी नद्यांचं 80 टीएमसी पाणी हे कोकणातून थेट मराठवाड्यात आणि गोदावरीच्या खोऱ्यात आम्ही आणत आहोतय आमचा निर्धार आहे, या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. दुष्काळमुक्त मराठवाडा आम्ही करून दाखवू.
स्टील, सीडस आणि आता सिल्क अशी जालन्याची ओळख ( Devendra Fadanavis Jalana News )
समृद्धी महामार्ग तयार करताना मी नेहमी सांगायचो की पुढचं महाराष्ट्राचं इंडस्ट्रीजच मॅग्नेट छत्रपती संभाजीनगर आणि जालना आहे. आज ते आपल्याला खरं होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत. कनेक्टिव्हिटी झाली आहे. ड्रायपोर्ट सुरू झाला आहे. आता तर आजच आम्ही जालन्याला सिल्क सिटी तयार कऱण्यासाठी पहिली बाजारपेठ सुरू केली आहे.
आता जालन्याची ओळख ‘3 S ‘ म्हणजे ट्रीपल एस स्टील, सीडस् आणि सिल्क सिटी अशी होणार आहे. पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात याच्या विकासाचा आराखडा आपण तयार केला आहे. येथील खासदार, आमदारांनी या सगळ्यांनी त्यासाठी कष्ट केले आहे. हा जिल्हा विकासाकडे अग्रेसर झाला आहे. जालना जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल सुरू झाली आहे. हा जिल्हा भाजपवर प्रेम कऱणारा आहे. ज्यावेळी भाजपची सत्ता नव्हती. त्यावेळी सुद्ध हा जिल्हा पाठीशी राहिला.
या जिल्ह्याने आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. म्हणून सर्वांच्या साक्षीने सांगतो की जालना जिल्ह्याच्या विकासात कोणताही कमतरता येऊ देणार नाही. तरूणाईला हाताला काम देण्यासाठी याठिकाणी वेगवेगळ्या योजना राबवणार असल्याती घोषणा फडणवीस यांनी केली.
विविध योजनांती रेलचेल ( Devendra Fadanavis Jalana News )
2014 पूर्वी अविकसित देश म्हणून ओळखलं जायचं त्याच देशाला आज सर्वात वेगवान आणि विकसित देश म्हणून मोदीजींच्या नेतृत्वात ओळखलं जाते. आमच्या सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय केला. कॉंग्रेस सारखी लबाडी आम्ही केली नाही. आमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत राहील. राज्यात 76 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देत आहे.
लवकरच 100 टक्के शेतकऱ्यांना वीज देऊ. आपण सौर कृषी योजना राबविली लवकरच 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ आणि 12 तास देऊ. आता काही पोपट बोलायला लागलेत. मात्र त्यांना सांगतो 55 हजार शेतकऱ्यांचे थकित वीजबिल माफ करून त्यांना बेबाकी प्रमाणपत्र देणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी योजना घोषित केली तेव्हा भरभरून आपल्याला मत दिली. विरोधक बोलत होते कर्जमाफी देणार नाही परंतू कोणतीही निवडणूक नसतांना आपण दिलेले वचन पाळलं आणि शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचं काम केलं.
2020 साली उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी दिली तेव्हा 2017 आधी मिळणार नाही असं सांगितली होतं. मात्र आता आम्ही सरसकट दिली, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. लाडकी बहीण योजना काहीही झालं तरी बंद होणार नाही, पैसे देत राहू. आता लखपती दीदी करायचं. 50 लाख लाडक्या बहिणी झाल्यात ते आता एक करोड कऱण्याचं उद्दिष्ट असल्याचे फडणवीस म्हणाले.