Translate :

Sponsored

Pune Court Koyta Attack, Big News, 2026 : पुणे पोलीस आयुक्तांना थेट कोर्टात बोलावलं ; मुख्यमंत्र्यांचीही नाराजी, पोलीस दलात होऊ शकतील फेरबदल

पुणे पोलीस आयुक्तांना थेट कोर्टात बोलावलं ; मुख्यमंत्र्यांचीही नाराजी, पोलीस दलात होऊ शकतील फेरबदल.

Pune Court Koyta Attack : पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील गोळीबार आणि कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांना न्यायालयात बोलावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीनंतर पुणे पोलीस दलात मोठ्या फेरबदलाची शक्यता.

पुणे : 26-11-2026

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ( Pune Court Koyta Attack) परिसरात झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर न्यायालय परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना न्यायलयात बोलावण्यात आले आहे. पुणे प्रधान व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे या पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार आहेत. न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेेंडे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. यावेळी न्यायलयाच्या आतील परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा आणि मेटल डिटेक्टर तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. काल शिवाजीनगर सत्र न्यायालय परिसरात झालेल्या भीषण हल्ल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तसेच न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत ही चर्चा कऱण्यात आली.

न्यायलय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ( Pune Court Koyta Attack)

मंदार किवळे याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायलयाच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे. न्यायलयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे. न्यायलयात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासणी केली जात आहे. तसेच, व्यक्तींसोबत असलेल्या वस्तूंचीही कसून तपासणी केली जात आहे. वकिलांसह त्यांच्यासोबत येणाऱ्या व्यक्तींनाही या तपासणी प्रक्रियेतून जावे लागत आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात दाखल झाले आहेत. परिसरातील सुरक्षेचा आढावा घेण्यासोबतच कोयता हल्ला झालेल्या  घटनास्थळालाही ते भेट देणार आहेत. सध्या न्यायलय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून, प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील गुन्हेगारीचा आढावा ( Pune Court Koyta Attack)

पुण्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची माहिती घेतली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वाढत्या गुन्हेगारीमधील नेमकी कारणे काय आहेत, याबाबत त्यांनी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे.

पुण्यात सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. या परिस्थितीमुळे पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. न्यायालय परिसरातील हल्ल्याची न्यायलयाने घेतलेली दखल, वाढवण्यात आलेली सुरक्षा आणि मुख्ममंत्र्यांनी घेतलेला आढावा यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored