Translate :

Sponsored

Pune Water Supply, Big News, 2026 : पुण्यात गुरुवारची पाणीकपात सुरूच ! दिवसाआड पाणी बंदचे संकट टळले : Pune Thursday Water Cut Resumes Pmc Announcements Pune

पुण्यात गुरुवारची पाणीकपात सुरूच ! दिवसाआड पाणी बंदचे संकट टळले.

Pune Water Supply : महापालिकेच्या पक्षनेत्यांना बैठक घेण्यासाठी वेळ मिळत नसल्याने महापालिकेतील पक्षनेत्यांची बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा बंदचे संकट तात्पुरते टळले आहे.

पुणे : 18-11-2026 

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्यावरील एकदिवसाआड (Pune Water Supply) पाणी बंदचे संकट टळले आहे. महापालिकेच्या पक्षनेत्यांना बैठक घेण्यासाठी वेळ मिळत नसल्येने महापालिकेतील पक्षनेत्यांची बैठक आता पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा बंदचे संकट तात्पुरते टळले आहे.

मात्र, दर गुरूवारी बंद ठेवला जाणारा पाणीपुरवठा या गुरूवारपासून पुन्हा बंद ठेवला जाणार आहे. उद्या (गुरूवारी) 19 नोव्हेंबरला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

राज्यात निर्माण झालेली दुष्काळाची स्थिती आणि पुणे शहराला पाणीपुरवठा कऱणाऱ्या धरणातील पाण्याचा साठा याचे नियोजन कऱण्यासाठी गेल्या महिन्यापासून पुणे शहरात प्रत्येक गुरूवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. 15 ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी सुरू कऱण्यात आली आहे.

दिवाळीच्या काळात मात्र प्रत्येक गुरूवारी पाणीकपात कऱण्यासाठी बंद ठेवला जाणारा पाणीपुरवठा रद्द कऱण्यात आला होता. दिवाळी सणाच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला होता. दिवाळीच्या काळात दोन गुरूवारी नियमितपणे शहरातील सर्व भागांना पाणीपुरवठा कऱण्यात आला.

मात्र आता पुन्हा प्रत्येक गुरूवारी संपूर्ण शहराटा पाणीपुरवठा बंद ठेवून पाणी कपात करण्यात येणार आहे. उद्या 19 नोव्हेंबरला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तरी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

वाढीव पाणी कपात कऱण्यापूर्वी ‘जलसंपदा’ कडून माहिती मागवा (Pune Water Supply)

‘शहरात सुरू असेलल्या पाणीकपातीमध्ये वाढ करण्यापूर्वी वाढ करण्यापूर्वी महापालिकेने जलसंपदा विभागाकडून पाणीवाटपाशी संबंधित सविस्तर माहिती मागवावी,’ अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे. ‘महापौर’ आमदार यांच्यासह महापालिकेतील पक्षनेत्यांनी या माहितीची पडताळणी करावी, ‘ असेही वेलणकर म्हणाले.

‘धरणातून शेतीला पाण्याचे आवर्तन देण्यापूर्वी पाणीपट्टीची थकबाकी नसलेल्या शेतकऱ्यांकडून पाणी मागणीपत्रे गोळा करणे आणि त्यानुसार किति पाणी, किती काळ सोडायचे याचे नियोजन कालवा समितीसमोर मांडणे आवश्यक आहेय यंदाच्या खरीप आवर्तनासाठी कालव्यातून सोडलेल्या पाच टीएमसी पाण्याबाबत शेतकऱ्यांची मागणीपत्रे तसेच उजव्या मुळा कालव्याच्या लाभक्षेत्रातील 65 हजार हेक्टर शेतीपैकी खरीप पिकांखालील क्षेत्र, पिकांचे प्रकार आणि ठिकाणांची माहिती मागवावी.

काय केली आहे मागणी ? (Pune Water Supply)

खरीप हंगामात 85 टक्के पाणी हंगामी पिकांसाठी आणि 15 टक्के बारमाही पिकांसाठी देता येते. रब्बी आवर्तनासाठी सोडलेल्या चार टीएमसी पाण्याची मागणीपत्रे आणि लाभक्षेत्रातील रब्बी पिकांचे क्षेत्र व प्रकार यांचीही माहिती जलसंपदा खात्याकडून घ्यावी,’ अशी मागणीही वेलणकर यांनी केली.

‘गेल्या महिन्यात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत खरीप आणि रब्बी आवर्तनासंबंधी देण्यात आलेली आकडेवारी तसेच या कालवा समितीच्या बैठकीचा वृत्तांत प्रसिद्ध करावा. संपूर्ण खरीप आवर्तनात मुंढवा जॅकवेलमधून शेतीसाठी पाणी का घेतले गेले नाही, याचे स्पष्टीकरण घ्यावे,’ अशी मागणी वेलणकर यांनी केली.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored