Translate :

Sponsored

Shivajinagar Court Firing, Shocking News, 2026 : पुण्यात भरदिवसा शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला ; सुप्रिया सुळेंची गृहखात्यावर टीका : Pune Shivajinagar Court Firing Incident

पुण्यात भरदिवसा शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला ; सुप्रिया सुळेंची गृहखात्यावर टीका.

Shivajinagar Court Firing : पुण्यात भरदिवसा शिवाजीनगर कोर्ट परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृहखात्यावर आणि पुणे पोलिसांच्या कार्युपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त करत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

पुणे : 25-11-2026

एकेकाळी पुणे हे शांत आणि शिक्षणासाठी प्रसिद्ध होते. मात्र आता पुण्यात ( Shivajinagar Court Firing ) गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक चारबाहेर आज (बुधवारी) भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्याचे गृहखाते आणि पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नेमकी घटना कशी घडली ? ( Shivajinagar Court Firing )

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात आज दुपारी नेहमीप्रमाणे वकील, पक्षकार आणि नागरिकांची मोठी वर्दळ होती. याच दरम्यान, न्यायलयाच्या गेट क्रमांक चारबाहेर काही हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे न्यायलय परिसरात प्रचंड घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसर ताब्यात घेतला असून फरार हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

सुप्रिया सुळे यांचा सरकार आणि पोलिसांवर हल्लाबोल ( Shivajinagar Court Firing )

या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत पुण्यातील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले आहे.

आपल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की,” विद्येचे माहेरघर आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुण्याची ओळख आज गुन्हेगारीचे आणि दहशतीचे शहर अशी होत चालली आहे, ही अत्यंत संतापजनक आणि दुर्देवी बाब आहे.”

” न्यायदानाच्या मंदिरातच रक्ताचा सडा पडत असेल तर ..” ( Shivajinagar Court Firing )

न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सुळे पुढे म्हणाल्या, ” न्यायालय हे सर्वसामान्य माणसांसाठी ‘न्यायदानाचे मंदिर’ असते. जिथे प्रत्येक नागरिक न्यायाच्या आणि संरक्षणाच्या अपेक्षेने येतो, त्याच पवित्र वास्तूच्या परिसरात जर भरदिवसा रक्ताचा सडा पडत असेल, तर सामान्य पुणेकरांनी कोणाकडे पहायचे ? “

या परिसरात पोलीस चौकी आणि सतत पोलिसांची वर्दळ असतानाही हल्लेखोर शस्रे घेऊन येतात आणि खून करतात, यावरून गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसल्याचे स्पष्ट होते, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

पुणे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह ( Shivajinagar Court Firing )

शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा पाढा वाचताना सुप्रिया सुळे यांनी ‘कोयता गँग’ची दहशत, गोळीबाराच्या घटना, भररस्त्यात होणारे खून आणि महिलांवरील अत्याचारांच्या उल्लेख केला. “पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. केवळ आश्वासने देऊन किंवा कागदोपत्री कारवाया करून शहरातील गुन्हेगारी थांबणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाचे कान टोचले आहे.

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्यां आपल्या पुण्याची ओळख आज गुन्हेगारीचे आणि दहशतीचे शहर अशी होत चालली आहे, ही अत्यंत संतापजनक आणि दुर्देवी बाब आहे.

पुणे पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहखात्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, जेणेकरून सर्वसामान्य पुणेकरांना पुन्हा एकदा निर्भयपणे जगता येईल, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored