Translate :

Sponsored

Tukaram Mundhe Pune FDA Raid , Big News, 2026 : तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील ‘मथुरा प्युअर व्हेज’ वर कारवाई, 7 रेस्टॉरंटसवर धडक कारवाई

तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील 'मथुरा प्युअर व्हेज' वर कारवाई, 7 रेस्टॉरंटसवर धडक कारवाई .

Tukaram Mundhe Pune FDA Raid : अन्न व औषध प्रशासनाने पुणे शहरातील हॉटेल्सवर मोठी कारवाई करत प्रसिद्ध ‘मथुरा प्युअर व्हेज’ हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अन्य सात रेस्टॉरंटसवरही त्यांनी कारवाई केली आहे.

पुणे : 05-07-2026

पुण्यातील खवय्यांसाठी आणि हॉटेल चालकांसाठी (Tukaram Mundhe Pune FDA Raid) एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (Food And Drug Administration ) पुणे शहरातील हॉटेल्सवर मोठी कारवाई करत प्रसिद्ध ‘मथुरा प्युअर व्हेज’ हॉटेल बंद करण्याते आदेश दिले आहेत. अन्न पदार्थांच्या चाचणीचे अहवाल येईपर्यंत हे हॉटेल बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच पुण्यातील तब्बल 7 नामांकित रेस्टॉरंटसचे परवाने एफडीएने निलंबित केले आहेत.

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe ) यांच्या कडक निर्देशानुसार ही धडक कारवाई कऱण्यात आल्याने हॉटेल चालकांचे धाबे दणादणले आहेत.

राज्यात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र ‘ ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात हॉटेल चालकांविरूद्ध अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. 1 ते 3 जुलै दरम्यान संपूर्ण राज्यातील तब्बल 70 हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसची अचानक तपासणी कऱण्यात आली.

अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळला (Tukaram Mundhe Pune FDA Raid)

 पुण्यातील ज्या 7 रेस्टॉरंटसवर एफडीएने धाडी टाकल्या, तिथे अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. तपासणी दरम्यान हॉटेलच्या स्वयंपाकघरात कमालीची अस्वस्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारत प्रशासनाने त्यांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.

‘मथुरा प्युअर व्हेज’वर मोठी कारवाई (Tukaram Mundhe Pune FDA Raid)

पुण्यातील प्रसिद्ध ‘मथुरा प्युअर व्हेज’वर झालेली कारवाई सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. एफडीएच्या पथकाने या हॉटेलमधील अन्नपदार्थांचे नमुने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेत. हा चाचणी अहवाल जोपर्यंत अधिकृतपणे येत नाही, तोपर्यंत हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कोणत्याही हॉटेलची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आगामी काळातही पुण्यात आणि संपू्र्ण महाराष्ट्रात ही तपासणी मोहीम अशीच तीव्रतेने सुरू राहणार असल्याने हॉटेल चालकांचे धाबे दणादणाले आहेत.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored