Translate :

Sponsored

Sharad Pawar Tukaram Mundhe, Big News, 2026 : तुकाराम मुंढेंच्या कारवाईविषयी शरद पवारांची प्रतिक्रिया : Sharad Pawar On Tukaram Mundhe Action Tukaram Mundhe Milk Price

तुकाराम मुंढेंच्या कारवाईविषयी शरद पवारांची प्रतिक्रिया .

Sharad Pawar Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी FDA ची सुत्रे स्वीकारल्यानंतर राज्यात भेसळविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. या कारवाईमुळे दूधाचे दर वाढल्याच्या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती : 03-09-2026

राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA (Sharad Pawar Tukaram Mundhe) च्या कारवायांमुळे गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंढे कायम चर्चेत आहेत. FDA ची सुत्रे हाती घेतल्यानंतर मुंढे यांनी अन्नपदार्थमधील भेसळ आणि नियमांचे उल्लंघन कऱणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या या भूमिकेचे विविझ स्तरांतून कौतुक होत असताना आता जेष्ठ्य नेते शरद पवार यांनीही भाष्य केले आहे.

दूधातील भेसळविरोधात सुरू असलेल्या कारावाईचा परिणाम दूधाच्या दरावर झाल्याचा मुद्दा शरद पवार यांच्यासमोर पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. पूर्वी सुमारे 60 रुपयांना मिळणाऱ्या दूधाचा दर आता 80 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले. त्यावर पवार यांनी भेसळ रोखण्याच्या कारवाईकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले.

काय म्हणाले शरद पवार ? (Sharad Pawar Tukaram Mundhe)

” दूधातील भेसळ थांबली आहे. त्यामुळे उत्पादकचा वाढली आहे. चांगलं दूध मिळत असल्याने ग्राहकही दोन पैसे देत आहेत. हे चांगलं आहे. ” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

दरम्यान, मुंबईतही FDA कडून अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन कऱणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात कारावाई कऱण्यात आली आहे. गोरेगाव येथील ईटक्लब ब्रँडस प्रायव्हेट लिमिटेड आणि कुर्ला येथील राणी क्रिएटर्स कन्सल्टंट अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांच्या अन्न परवान्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई कऱण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य (Sharad Pawar Tukaram Mundhe)

पत्रकार परिषदेत शरद पवार यांना मनोज पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांन ” बघूया आता काय होतेय, सकाळी काही मंत्री तिथे जाणार आहेत,” असे सांगितले.

एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असताना दुसरीकडे FDA च्या कारवायांमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा विषय ऐरणीवर आला आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवायांमुळे भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन कऱणार्या व्यावसायिकांमध्ये धाक निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र, या कारवाईसोबतच सामान्य ग्राहकांवर वाढणाऱ्या किंमतींचा परिणाम किती होतो, याकडेही लक्ष लागले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored