Translate :

Sponsored

Tardeo Estate Agent, Big News, 2026 : ताडदेव मांसाहार प्रकरणात मनसेची उडी ! अटक केली नाही तर खळखट्याक होणार : Tardeo Housing Row MNS Files Police Complaint Over Vegetarian Only Home Ad

ताडदेव मांसाहार प्रकरणात मनसेची उडी ! अटक केली नाही तर खळखट्याक होणार

Tardeo Estate Agent : मुंबईत सध्या एका रिअल इस्टेट एजंटचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या रिअल इस्टेट एजंटने तुम्ही मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही असे म्हणत एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओवरून आता संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई : 13-08-2026

मुंबईतील ताडदेव परिसरातील एका इमारतीच्या (Tardeo Estate Agent) घराच्या जाहिरातीने नवा वाद निर्माण झाला आहे. या जाहिरातीत केवळ शाकाहारी लोकांनाच घर देण्यात येईल अले म्हटले आहे. रिअल इस्टेट एजंट भावेश कावरेने सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडिओ शेअर केला होता. आता हे प्रकरण मनसेने हातात घेतल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसे (मनसे) या प्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात तक्रा दाखल केली आहे.

मनसे विभागाध्यक्ष दिनेश ज्ञानेश्वर पुंडे यांनी ही तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जाहिरातीच्या माध्यमातून शाकाहारी-मांसाहारी वाद निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे सामाजिक, धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी (Tardeo Estate Agent)

तक्रारीत संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 153ए आणि 295 ए अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित व्यक्तीला अटक करावी, असेही सांगण्यात आले.

मनसेने स्पष्ट इशारादिला आहे की, या जाहिरातीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन जबाबदार राहील. ताडदेव परिसरातील या जाहीरातीने आता राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू झाली असून, पोलिसांकडून पुढील कारवाईबाबत प्रतिक्रिया अपेक्षित आहे. ही घटना मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात शाकाहारी-मांसाहारी भेदाबाबत चालणाऱ्या चर्चांना नवे वळण देणारी ठरली आहे.

काय आहे प्रकरण ? (Tardeo Estate Agent)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक रिअल इस्टेट एजंटने तुम्ही मासांहार करत असाल तर ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही. तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला घर मिळेल असे म्हटले होतेय हा व्हिडिओ व्हायरल होताच सर्व स्तरातून संताप व्यक्त केला होता. त्यानंतर भावेशने हा व्हिडिओ डिलिट करून टाकला. आता मनसेने या विेरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

भावेशने या प्रकरणात काय म्हटले आहे ? (Tardeo Estate Agent)

भावेश याबाबत म्हणाला की, ” जो फ्लॅटचा मालक आहे तोच ठरवेल की तो फ्लॅट कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही. मी ठरवणारा कोणीच नाही. त्यातच एक महान नेता आपल्या युवाला असं बोलतोय की, दिसेल तिथे ठोका. हे कितपत योग्य आहे ? मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मावळा आहे. त्यांच्या राज्यातही शाकाहारी आणि मांसाहारी लोकंही होते.”

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored