Translate :

Sponsored

Director Vijaya Mehta Pasees Away, Sad News, 2026 : ज्येष्ठ्य नाट्यदिग्दर्शक विजयाबाई मेहता यांचे निधन ! अवघी रंगभूमी झाली पोरकी : Veteran Director Vijaya Meheta Passes Away

ज्येष्ठ्य नाट्यदिग्दर्शक विजयाबाई मेहता यांचे निधन ! अवघी रंगभूमी झाली पोरकी .

Director Vijaya Mehta Pasees Away : मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ्य नाट्यदिग्दर्शक विजयाबाई मेहता यांचे निधन झाले आहे. त्याच्या मुंबईतील रहात्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई : 30-06-2026

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ्य दिग्दर्शिका विजया मेहता (Director Vijaya Mehta Pasees Away) यांचे त्यांच्या रहात्या घरी निधन झाले आहे. नाना पाटेकर, विक्रम गोखले अशा दिग्गज कलाकारांच्या यशामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे. मराठी रंगभूमीवरील अनेक कलाकार त्यांनी घडवले होते. विजया मेहता यांनी 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रख्यात चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक विजया मेहता यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांनी समांतर आणि सिनेमा आणि नाट्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. अनेक चित्रपटात त्यांनी अभिनयसुद्धा केला होता. 60 च्या दशकातील नाट्यकर्मींपैकी त्या एक महत्त्वाच्या व्यक्तिमत्व होत्या.

विजया मेहता यांच्याविषयी (Director Vijaya Mehta Pasees Away)

विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 ला गुजरातच्या बडोदा येथे झाला होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर दिल्लीत इब्राहिम अल्काझी आणि आदी मर्झबान यांच्याकडे नाट्यकलेचे शिक्षण घेतले. 60 च्या दशकात मराठी प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी आपली छाप पाडली.

नाटककार विजय तेंडूलकर, अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत त्यांनी ‘रंगायन’ या नाट्यगटात काम केले. विजया बाई त्या गटाच्या संस्थापक सदस्य होत्या. मराठी रंगभूमीत त्यांना ‘बाई’ असे आदराने संबोंधले जात असे. त्यांच्या आत्मवृत्तपर पुस्तक ‘बाई’ या नावानेच काही वर्षांपूर्वीच प्रकाशीत झाले होते. त्यांचे ‘एक शुन्य बाजीराल’ असे हे सी.टी. खानोलकर लिखित नाटक भारतीय रंगभूमीवरील एक मैलाचा दगड मानले जाते.

विजया बाईंना मिळालेले सन्मान Director Vijaya Mehta Pasees Away

दिग्दर्शनातील उत्कृष्टतेसाठी विजया मेहता यांना 1974 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान कऱण्यात आला होता. तर 1986 मध्ये ‘राव साहेब’ (1986) मधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रिचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यांनी दुर्गा खोटे यांचा मुलगा हरिन खोटे यांच्याशी विवाह केला होता. हरिन खोटे यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी फर्रोख मेहता यांच्याशी दुसरा विवाह केला होता.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored