Translate :

Sponsored

Kuku Kohli Died, Sad News, 2026 : कुकू कोहली यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन, बॉलिवूडवर शोककळा : Kuku Kohli Died Aruna Irani Love Story

Kuku Kohli Died : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक कुकू कोहली यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री अरूणा ईराणी त्यांची पत्नी होत्या.

मुंबई : 26-08-2026

प्रसिद्ध दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli Died) यांचे 25 ऑगस्ट रोजी वयाच्या 77 वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासोबतच  त्यांचे वैयक्तिक आयुष्यही वेगळे होते. कुकू कोहली यांनी अभिनेत्री अरूणा ईराणी यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. मात्र, दोघांनीही त्यांचे हे नाते आणि लग्न बराच काळ जगापासून लपवून ठेवले होते.

सुमारे दोन वर्षांपासून ‘झूम’ला दिलेल्या एका मुलाखतीत अरूणा ईराणी यांनी कुकू कोहली यांच्यासोबतच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते. कुकू यांच्यासोबत जवळीक वाढली, त्यावेळी ते आधीच विवाहित होते. त्यामुळेच दोघांनी आपल्या नात्याबद्दल सार्वजनिक न बोलण्याचा निर्णय घेतला होता.

कुकू कोहली यांची चित्रपट कारकिर्द  आणि जीवनपट (Kuku Kohli Died)

कुकू कोहली यांचा जन्म 4 जून 1949 ला पेशावर येथे झाला. त्यांनी अजय देवगणला आपल्या चित्रपटातून पहिला ब्रेक दिला. 1991 ला त्यांच्या फूल और कांटे या चित्रपटाने बॉलिवूडला अजय देवगणसारखा ॲक्शन हिरो दिला. कोहली यांनी त्यांच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये राज कपूर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले. सनी देओल च्या बेताब चित्रपटाचे ते सेकंड युनिट डायरेक्टर होते. सुमारे 30 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केले.

याशिवाय त्यांचे ‘अर्जुन’, ‘फूल और कांटे’, ‘कोहराम’, ‘हकिकत’, जुल्मी, अनाडी नंबर 1, ये दिल आशिकाना अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. वोह तेरा नाम था हा त्यांच्या शेवटचा चित्रपट होता.

‘कोहराम’ च्या सेटवर झाली पहिली भेट (Kuku Kohli Died)

अरूणा ईराणी यांनी सांगितले की , कुकू कोहली आणि त्यांची पहिली भेट ‘कोहराम’ चित्रपटाच्या निमित्ताने झाली. त्या काळात अरूणा अनेक चित्रपटांमध्ये काम करत होत्या आणि त्यांच्याकडे कामाचा मोठा व्याप होता. कुकू यांनी त्यांच्याकडे एक महिन्याच्या शूटिंगसाठी डेटस मागितल्या होत्या. मात्र, व्यस्त वेळापत्रकामुळे काही दिवस काम केल्यानंतर अरूणा यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या या निर्णयामुळे कुकू नाराज झाले. सुरूवातील दोघांमध्ये अनेकदा मतभेद होत असत. अरूणा यांनी सांगितले होते की, कधी त्यांच्याकडे काम नसायचे, तरीही कुकू त्यांना दिलेल्या डेटसनुसार सेटवर बोलवायचे. कधी कधी त्या दिवसभर सेटवर बसून राहायच्या आणि शेवटी त्यांच्याकडून केवळ एक शॉट घेतला जायचा. त्यामुळे त्यांना कुकूंचा खूप राग यायचा.

भांडणातून मैत्री आणि मैत्रीतून प्रेम (Kuku Kohli Died)

सततच्या मतभेदानंतर मात्र हळूहळू कुकू कोहली यांच्या वागण्यात बदल झाला. ते अरूणांच्या कामाच्या वेळापत्रकानुसार स्वतःचे नियोजन करू लागले. दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि ही मैत्री पुढे प्रेमात बदलली.

अरूणा यांनी सांगितले होते की, सुरूवातीला त्या कुकूंचा तिरस्कार करत होत्या आणि कुकू यांनाही त्यांच्या काही गोष्टींबद्दल नाराजी होती. मात्र, काळ पुढे गेला आणि दोघांमधील नाते अधिक घट्ट होत गेले आणि अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

कुकू आधीच विवाहित होते, म्हणून लग्न ठेवलं गुपित  (Kuku Kohli Died)

कुकू कोहली आधीच विवाहित असल्याने अरूणा ईराणी यांनी हे नाते सार्वजनिक न कऱण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पहिल्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबाला या नात्याची माहिती होती, असेही अरूणा यांनी मुलाखतीत सांगितले होते.

अरूणा यांनी स्पष्ट केले होते की, कुकू यांच्या पहिल्या लग्नाबद्दल त्यांना माहिती नव्हती, अशी माहिती चुकीची आहे. त्यांच्या पहिल्या पत्नी मुलांसह शूटींगच्या ठिकाणी येत असत आणि अरूणा ईराणींना त्यांच्या कुटुंबांबद्दल सर्व माहिती होती. परिस्थिती सोपी नसतानाही अखेर दोघांनी लग्न केले.

दोघांनाही मूल न होऊ द्यायचा घेतला निर्णय (Kuku Kohli Died)

कुकू कोहली आणि अरूणा ईराणी यांना अपत्य नव्हते. मूल न होण्याचा निर्णय दोघांनाही घेतला होता. अरूणा यांनी या बद्दल बोलताना हा निर्णय योग्य नव्हता, असेही म्हटले होते.

कुकू यांचेे आधीच एक कुटुंब असल्यामुळे त्यांनी मूल न कऱण्याचा निर्णय घेतल्याचे अरूणांनी सांगितले होते. तसेच, आपल्याशी लग्न कऱण्यासाठी कुकू यांनी संपूर्ण जगाशी संघर्ष केला, असेही त्यांनी नमूद केले होते.

कुकू कोहली यांच्या निधनानंतर त्यांच्या चित्रपटांबरोबरच अरूणा ईराणी यांच्यासोबतची त्यांची ही प्रेमकहीणी पुन्हा चर्चेत आली आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored