Translate :

Sponsored

Mumbai Pune Expressway Missing Link, 2026 : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, रेल्वे गाड्या रद्द, मिसिंग लिंकवर दरड कोसळली : Administration HAs Closed The Mumbai pune Expressway Well As The Railway Line Due To A landslide And Citizens Are Being Urged To Avoid Travelling

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, रेल्वे गाड्या रद्द, मिसिंग लिंकवर दरड कोसळली. ( फोटो-सोशल मीडिया)

Mumbai Pune Expressway Missing Link : राज्यात पावसाचे थैमान सुरू आहे. मुंबई-पुणे वाहतूक पूर्णपणे बंद कऱण्यात आली आहे. रेल्वे मार्गावर दरड कोसळली, ज्यामुळे दोन्ही बाजूच्या रेल्वे गाड्या रद्द कऱण्यात आल्या आहेत. एक्सप्रेस वेवरही तिच परिस्थीती आहे. दरड कोसळली आहे. नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मुंबई : 06-07-2026 

राज्यात सध्या पावसाचा धुमाकुळ सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच मुंबईसह  (Mumbai Pune Expressway Missing Link ) पुण्यातही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जाहीर केला आहे. सतत पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच आता पुणे आणि मुंबई महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला. यासोबतच सीएसएमटीकडून पुण्याकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्याही रद्द कऱण्यात आल्या आहेत.

पुणे आणि मुंबई वाहतूक पूर्णतः ठप्प झालीय मिसिंग लिंकवर दरड तर द्रुतगतीवर पाणी साचले आहे. रेल्वे मार्गावर ही दरड कोसळळी आहे. पुणे आणि मुंबई वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे. मिसिंग लिंकवर दरड तर द्रुतगतीवर पाणी साचले आहे. रेल्वे मार्गावर ही दरड कोसळली आहे. पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळे हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे.

घराबाहेर न पडण्याचा सल्ला  (Mumbai Pune Expressway Missing Link )

महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आजा वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे पुणे आणि मुंबई प्रवास कऱणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

दरड कोसळल्यामुळे आणि सुरू असलेल्या मुसळधरा पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग तसेच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. सध्या पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. सध्या पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे या दोन्ही दिशेतील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद कऱण्यात आली आहेत. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास टाळावा.

प्रवास टाळा  (Mumbai Pune Expressway Missing Link )

ज्यांनी प्रवासाचे नियोजन केले आहे, त्यांनी तो पुढे ढकलावेत आणि शासन व संबंधित यंत्रणांकडून जाहीर कऱण्यात येणाऱ्या वाहतूक सूचना व अद्ययावत माहितीकडे लक्ष द्यावे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती केली जात आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे वरती वाहनांची मोठी गर्दी बघायला मिळतयं. लोणावळ्याहून 35 किलोमीटर दूरुपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

पुणे शहरात पावसाचा जोर दोन दिवस कायम राहणार असल्याचा मोठा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला. त्यामध्येच आता पुणे मुंबई एक्स्प्रेस वे पू्र्णपणे बंद करण्यात आला. गेल्या तीन तासांपासून लोणावळा घाटात मोठी वाहतूककोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांनी शक्य असल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन कऱण्यात येत आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored