Translate :

Sponsored

Maharashtra Rain Update, Important News, 2026 : महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! पुण्यासह पाच जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट : Maharashtra Rain Yellow Alert Update

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! पुण्यासह पाच जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट .

Maharashtra Rain Update : या आठवड्यात विश्रांती घेतलेल्या मान्सूनने आता परत एकदा दमदार सुरूवात केल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पुढील आठवड्यात कोणकोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस असणार आहे ? कोणत्या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे, जाणून घेऊन.

पुणे : 16-07-2026

गेल्या आठवड्यात पावसाने दमदार सुरूवात केली होती. मात्र महाराष्ट्रातील (Maharashtra Rain Update) काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जुलैचा अर्धा महिना उलटून गेला तरीही राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण, घाटमाथा, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा पाऊस झालेला नाही. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 20 जुलैनंतर देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

आज काही जिल्ह्यांना यलो अलर्ट (Maharashtra Rain Update)

हवामान विभागाने आज पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त कऱण्यात आला आहे.

कोकणात हलका पाऊस (Maharashtra Rain Update)

कोकण विभागात सध्या दमट आणि ढगाळ वातावरण कायम आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष हवामान इशारा जाहीर केलेला नाही.

मराठवाड्यात व्यापक पावसाची शक्यता कमी (Maharashtra Rain Update)

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. धाराशिव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असला तरी व्यापक स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या भागातगी मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडणार आहे.

उत्तर महाराष्ट्राला पावसाची प्रतिक्षा (Maharashtra Rain Update)

धळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरात हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. अनेक भागांत उष्णता आणि दमट वातावरण कायम असल्याने शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार, याकडे लागले आहे.

20 जुलैनंतर मान्सनला गती मिळण्याची शक्यता (Maharashtra Rain Update)

सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पावसासाठी अनुकूल हवामान प्रणाली सक्रिय नसला, तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 जुलैनंतर देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढतो का, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored