Translate :

Sponsored

Atul Kulkarni Support Wangchuk, Big News, 2026 : सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ अतुल कुलकर्णीं आले पुढे, एकदिवसीय उपोषणाची घोषणा, सरकारला चर्चेचे आवाहन : Atul Kulkarni To Observe One Day fast In Support Of Sonam Wangchuk Urges Goverment To Initiate Talks

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ अतुल कुलकर्णीं आले पुढे, एकदिवसीय उपोषणाची घोषणा, सरकारला चर्चेचे आवाहन .

Atul Kulkarni Support Wangchuk : अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ 16 जुलै रोजी एक उपोषण कऱण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला अनेक क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून काही कलाकारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली आहे.

मुंबई : 16-06-2026

सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक (Atul Kulkarni Support Wangchuk) यांच्या उपोषणाला आता कलाकार मंडळींकडून पाठिंबा मिळत आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ 16 जुलै एक दिवसाचे उपोषण कऱण्याची घोषणा केली आहे. तसेच सरकारने तातडीने संवाद सुरू करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या विविध मागण्यांवर सरकारने चर्चा करावी, अशी त्यांची भूमिका आहे. या आंदोलनाला अनेक क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून काही कलाकारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली आहे.

इंस्टाग्रामवर पोस्ट करून केले आवाहन (Atul Kulkarni Support Wangchuk)

अतुल कुलकर्णी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आपल्या उपोषणामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,” आज 16 जुलै रोजी मी माझ्या घरातून एक दिवसाचे उपोषण करणार आहे. सोनम वांगचूक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होत असलेल्या वेदनांशी एकरूप होण्यासाठी आणि सरकारने संवेदनशीलता दाखवत त्यांच्याशी संवाद करावा, यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. “

ते म्हणाले की, त्यांनी सरकारला थेट आवाहन केले. ” मला वाटत नाही की सरकार असंवेदनशील आहे. मात्र या प्रकरणात काही गैरसमज झाल्यामुळे संवाद होत नाही. सरकारने तातडीने चर्चा सुरू करावी. मतभेद असले तरी संवाद हा मार्ग असला पाहिजे.” असे कुलकर्णी यांनी म्हटले.

तसेच ज्यांना सोनम वांगचुक यांच्या मागण्या योग्य वाटतात त्यांनी हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा आणि शक्य असल्यास एक दिवसाचे उपोषण करून त्यांना प्रतिकात्मक पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored