Translate :

Sponsored

Ketan Agarwal Murder Case, Shocking News, 2026 : ‘मी केतनला माझ्या अफेअरबद्दल सगळं सांगितलं..मात्र …सिया गोयलने केला गुन्हा कबूल

'मी केतनला माझ्या अफेअरबद्दल सगळं सांगितलं..मात्र ...सिया गोयलने केला गुन्हा कबूल

Ketan Agarwal Murder Case : पुणे शहर सध्या केतन अग्रवाल खूनाच्या घटनेमुळे हदरले आहे. दररोज या घटनेतील धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनचा खून हा एका क्षणीक प्रसंगात घडलेला नसून, सिया गोयल आणि तिचा साथिदार या दोघांनी अत्यंत थंड डोक्याने केतनला संपवले आहे. या खूनामागे त्यांचे अनेक दिवसांचे प्लॅनिंग होते. सियाने स्वतः याबाबत नवीन माहिती दिली आहे.

पुणे : 25-06-2026

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Ketan Agarwal Murder Case) यांचा मुलगा केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळत आहे. पोलिस तपासातून दररोज नवीन गोष्टींचा खुलासा होत आहे. पोलीस कोठडीत असलेल्या सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या चौकशीतून रोज नवे आणि थक्क करणारे खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनचा खून हा कुठल्याही रागाच्या भरात किंवा अचानक झालेला नसून, त्यामागे अनेक दिवसांचे अतिशय थंड डोक्याने केलेले ‘क्रिमिनल प्लॅनिंग होते.

सियाने पोलिसांकडे असा दावा केला आहे की, तिने तिच्या अफेअरबद्दल आणि चेतनबाबत केतन अग्रवाल या आपल्या नियोजित नवऱ्याला सगळं सांगितले होते.

काय म्हणाली सिया गोयल (Ketan Agarwal Murder Case)

चौकशीदरम्यान सियाने पोलिसांकडे एक वेगळाच दावा केला आहे. ” ती म्हणाली, ” माझं आणि चेतनचं अफेअर आहे, हे मी केतनला स्पष्ट सांगितलं होतं.” मला हे लग्न करायचं नाही आणि पळून जायचं आहे, असंही मी त्याला वारंवार सांगितलं होतं. पण केतन लग्न रद्द करण्यास तयार नव्हता. ‘ आता लग्न मोडू शकत नाही, मात्रं कुटुंब खूप श्रीमंत आहे, तू कुठेही गेलीस तरी तुला शोधून काढू’ असे केतन मला म्हणत होता.’

सियाच्या घरचे चेतनसोबतच्या नात्याच्या पूर्णपणे विरोधात होते. केतन हा गर्भश्रीमंत घरचा असल्याने तिच्या घरच्यांचा या लग्नासाठी सियावर प्रचंड दबाव होता. सिया आणि चेतन या दोघांनाही अंमली पदार्थांचे व मद्यपानाचे व्यसन होते. तिच्या या सवयींमुळे तिचे पालक चिंतेत होते. यामुळेच त्यांना तिचे लग्न लवकर करायचे होते.

पोलिस तपासात सियाने गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनचा काटा काढण्यासाठी तिने आणि चेतनने आधीच एक सांकेतिक खूण ठरवली होती. योजनेनुसार, योग्य वेळ येताच सियाने केतनच्या समोर खाली वाकायचे होते, जेणेकरून मागे उभ्या असलेल्या चेतनला केतनला दरीच ढकलणे सोपे जाईल. त्या दिवशी दरीजवळ पोहोचताच सियाने तो ‘सिग्नलट दिला. ती खाली वाकली आणि मागून आलेल्या चेतनने केतनला थेट दरीत ढकलून दिले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिप गिल यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण क्रूर कटाची मुख्य सुत्रधार सिया गोयल हीच होती.

सिया गोयलची कबूली (Ketan Agarwal Murder Case)

तपासात आणकी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केतनला संपवण्यासाठी या सिया आणि चेतनने एक नाही तर तब्बल तीन प्लॅन तयार ठेवले होते. 31 मे रोजी सियाने केतनसोबत लोहगडला जाऊन ‘डेथ पॉईंट’ निश्चित केला होता. त्यानंतर 14 जूनला तिने केतनला दरीत ढकलण्याचा पहिला प्रयत्न केला, पण सुदैवाने एका झाडाचा आधार मिळाल्याने केतन वाचला. तेव्हा सियाने, ‘तुला सापापासून वाचवण्यासाठी धक्का दिला.” असा बनाव रचून विषय संपलला. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर 18 जूनला दुसरा प्लॅन अंमलता आणला गेला, आणि केतनची हत्या करण्यात आली.जर केतन त्या दिवशीही वाचला असता, तर त्याला थेट रस्ते अपघातात मारण्याचा तिसरा प्लॅन होता.

हत्येची केली होती संपूर्ण तयारी (Ketan Agarwal Murder Case)

हत्येच्या दिवशी आरोपी भरपूर तयारी करून आले होते. लोहगडाच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक धीरज जाधव यांनी माहिती दिली की, घटनेच्या दिवशी चेतन पूर्ण कपडे आणि तोंडाला मास्क लावून आला होता, त्याने तिकीटाचे 25 रुपये नंतर देतो सांगून, व्यायामासाठी आलोय, असे सांगितले होते. सियानेही ऑनलाईन पेमेंटवरून हुज्जत घातली होती.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored