Translate :

Sponsored

Pune Crime Ketan Agrawal Murder, Sad News, 2026 : केतनच्या मृत्यूनंतर पित्याची भावनिक पोस्ट, न्यायासाठी आक्रोश : Ketan Agrawal Murder, Vishal Agrawal Wrote Emotional Post

केतनच्या मृत्यूनंतर पित्याची भावनिक पोस्ट, न्यायासाठी आक्रोश

Pune Crime Ketan Agrawal Murder : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे पुत्र केतन अग्रवाल यांचा ट्रेकिंग करताना पाय घसरून मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. केतनच्या नियोजित वधूने त्याचा काटा काढल्याचे आता तपासात निष्पन्न झाले आहे. या सगळ्या प्रकरणात आता केतनचे वडिल विशाल अग्रवाल यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

पुणे : 23-06-2026 

लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून 24 वर्षीय केतन विशाल अग्रवाल (Pune Crime Ketan Agrawal Murder) याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता त्याची नियोजित वधू आणि तिचा मित्र दोघांना अटक कऱण्यात आली आहे. सिया गोयल हिने केलेल्या दाव्याप्रमाणे केतन हा सेल्फी काढताना अपघाताने 400 फूट खोल दरीत पडला नसून तिनेच त्याला दरीत ढकलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकऱणात केतनची 20 वर्षीय नियोजित वधू सिया प्रविण बसेसर गोयल, तिचा मित्र आणि अन्य साथिदारांनी कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जर लोहगडावरील त्यांचा हा प्लॅन फेल ठरला तर सिया आणि तीच्या मित्राचा दुसरा प्लॅनही तयार होता. महाबळेश्वरला जाऊन ते केतनला संपवणार होते.

विशाल अग्रवाल यांची पोस्ट (Pune Crime Ketan Agrawal Murder)

केतनचे पिता विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या समोर आली आहे. त्यामुळे सर्वांनाच त्यांच्या दुःखाची जाणीव होत आहे. ते आपल्या पोस्टमध्ये लिहितात, ” पुण्यातील सिया प्रविण बसेसर गोयल या धुर्त मुलीने जिचे आधीपासूनच अनैतिक संबंध होते, आमचा साधा-भोळा मुलगा केतन याच्याशी एक बनावट विवाह रचला. तिच्या चारित्र्याबद्दल, भूतकाळातील वागणुकीबद्दल तिच्या संपूर्ण कुटुंबाला व नातेवाईकांना पूर्ण कल्पना होती. तरीही त्यांनी जाणीवपूर्वक सत्य लपवून ठेवले आणि आमची मोठी फसवणूक केली, असं अग्रवाल यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. आम्हा पीडित पालकांच्या अतःकरणातून शाप आणि न्यायासाठी आक्रोश होत आहे, असे ते म्हणाले.

मुलाचा जीव घेण्याची काय गरज ? (Pune Crime Ketan Agrawal Murder)

त्या मुलीने यापूर्वीही केतनचा जीव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. अखेरीस 18 तारखेला तिने त्याच मित्राच्या मदतीने आमच्या मुलाचा निर्घुणपणे जीव घेतला. समाजाला आमचा एकच प्रश्न आहे, जर त्या मुलीचे वागणे असे होते. तर संबंध सहजपणे तोडता आले असते. मग आमच्या निष्पाप मुलाचा जीव घेण्याची काय गरज होती ? या कधीही भरून न येणार्या हानीची भरपाई कोण करणार ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored