Translate :

Sponsored

Canada Pune IT News, Good News, 2026 : कॅनडातील नामांकित ‘कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर’कडून पुण्यातील ‘पिओसिट सॉफ्टवेअर’चे अधिग्रहण

कॅनडातील नामांकित 'कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर'कडून पुण्यातील 'पिओसिट सॉफ्टवेअर'चे अधिग्रहण.

Canada Pune IT News : सध्या अमेरिका आणि युरोपीय देशांमधून भारतातील आयटी कंपन्यांसाठी संमिश्र वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. काही देशांमध्ये भारतीय ‘टॅलेंट’ला मागणी वाढत आहे, तर अमेरिकेसारख्या देशात आता आयटीसह अनेक क्षेत्रातील कर्मचारी आणि कंपन्यांना जाचक व्हिजा अटी लागू होत आहे. अशावेळी कॅनडातून महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी आहे. पुण्यातील ‘पिओसिट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रयव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे कॅनडातील एका महत्त्वाच्या कंपनीने करार केला आहे.

पुणे : 02-06-2026 

सॉफ्टवेअर क्षेत्रातील (Canada Pune IT News)  एक मोठी आणि महत्त्वाची व्यावसायिक घडामोड समोर आली असून, कॅनडातील नामांकितकॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर (सीएसआय) या कंपनीने भारतातीलपिओसिट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडया कंपनीचे अधिग्रहण केले आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे जागतिक सॉफ्टवेअर बाजारपेठेत दोन्ही कंपन्यांचे स्थान अधिक बळकट होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी पकड असलेल्या कंपनीने पुण्यातील एका महत्त्वाच्या सॉफ्टवेअर कंपनीला आपल्या समूहात सामील करून घेतल्याने या व्यवहाराकडे तंत्रज्ञान जगतात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.

पिओसिट सॉफ्टवेअर सोल्यूशन्सही भारतीय कंपनी प्रामुख्याने सहकारी बँकिंग आणि वित्त क्षेत्रांसाठी उपयुक्त आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली तयार करण्याचे काम करते. आपल्या दर्जेदार सेवा आणि ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेल्या तंत्रज्ञानामुळे या कंपनीने बाजारपेठेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आताकॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअरचा भाग झाल्यामुळे पिओसिट कंपनीला जागतिक पातळीवरील एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) सारखे अद्ययावत तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची व्याप्ती आणि मोठ्या समूहाच्या अनुभवाचा थेट फायदा मिळणार आहे. या पाठबळामुळे कंपनीला आपल्या सेवांचा विस्तार अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर करणे शक्य होईल.

160 देशातील  1,000 कंपन्यांचे अधिग्रहण (Canada Pune IT News)

1995 पासून, ‘कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअरसंबंधित उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाचे (क्रिटिकल) सोल्युशन्स देणाऱ्या व्हर्टिकल मार्केट सॉफ्टवेअर (व्हीएमएस) कंपन्यांचे अधिग्रहण करणे, त्यांची उभारणी करणे आणि त्यांना जोपासणे या तत्त्वावर काम करत आहे. 30 हून अधिक वर्षांच्या वाटचालीनंतर, ‘सीएसआयने 160 हून अधिक देशांमधील 125 हून अधिक व्हर्टिकल्समधील 1,000 हून अधिक कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. सीएसआय ही टोरंटो स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असलेली कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्यांचा महसूल 11.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता आणि जगातील टॉप 10 सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक म्हणून ती नावारूपास आली आहे.

सहकारी पतसंस्थांना मिळणार जागतिक दर्जाचेएआय एनेबल्डसॉफ्टवेअर (Canada Pune IT News)

पिओसिटचे संस्थापक संचालक दीपक सुराणा, अभिजित नांगरे आणि श्रीकांत मुळे यांनी सांगितले की, ‘कॉन्स्टेलेशन कुटुंबात सामील होणे, हा पिओसिट आणि आम्ही उभारलेल्या टीमसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रत्येक भागधारकासाठी एका चांगल्या मूल्याची भागिदारी (व्हॅल्यू) निर्माण करू. सॉफ्टवेअर कंपन्यांना जोपासण्याचाकॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअरचा जागतिक अनुभवपिओसिटला एआय सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास मदत करेल. भारतातील सहकारी पतसंस्थांना आता जागतिक दर्जाचेएआय एनेबल्डसॉफ्टवेअर आणि सेवा मिळतील. पिओसिट एक स्वतंत्र कंपनी म्हणून राहील आणि आमच्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम सॉफ्टवेअर आणि सेवा देण्यासाठी आमची बांधिलकी कायम राहील. पूर्वीप्रमाणेच संस्थापकटीम पिओसिटचे नेतृत्व करत राहील.’

This post was last modified on June 2, 2026 5:30 pm

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored