Translate :

Sponsored

NEET UG Re-Exam, Good News,2026 : नीट युजी पुर्नपरीक्षेचे ‘ॲडमिट कार्ड’ वितरीत, जाणून घ्या डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स : NEET UG Re Exam Admit Card Released NTA Website Download Link Exam

नीट युजी पुर्नपरीक्षेचे 'ॲडमिट कार्ड' वितरीत, जाणून घ्या डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स .

NEET UG Re-Exam : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 21 जून 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेचे ॲडमिट कार्ड वितरीत केले आहे. याशिवाय यावेळी एनटीएने परीक्षा पद्धतीत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. जाणून घ्या काय आहेत हे बदल.

दिल्ली : 16-06-2026

नॅशनल टेस्टींग एजन्सीने (NTA UG 2026) पुर्नपरीक्षेबाबत ( NEET UG Re-Exam)  महत्त्वाची बातमी आहे. या पुर्नपरीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) वितरीत करण्यास सुरूवात झाली आहे. हे प्रवेशपत्र एनटीएच्या neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून, विद्यार्थी त्यांच्या लॉगिन तपशीलांच्या मदतीने ते डाऊनलोड करू शकतात. ही परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार आहे. परीक्षेचा दिवस जवळ आल्याने या दिवसांमध्ये सर्व उमेदवारांनी नियमितपणे वेबसाईट तपासण्याचा आणि आपले ॲडमिट कार्ड वेळेत डाऊनलोड कऱण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

NEET UG री-एक्साम ॲडमिट कार्ड कसे डाऊनलोड करावे ? ( NEET UG Re-Exam)

  • 1.  सर्वात आधी उमेदवारांनी एनटीएच्या आधिकृत वेबसाईटला (neet.nta.nic.in) भेट द्यावी.
  • 2. आता होमपेजवर असलेल्या ‘NEET UG Re-Exam 2026 Admit Card ‘ या लिंकवर क्लिक करा.
  • 3. यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाका.
  • 4. लॉगिन केल्यानंतर तुमचे ॲडमिट कार्ड स्क्रिनवर दिसेल.
  • 5. प्रवेशपत्रावरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
  • 6. शेवटी, ॲडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि त्याची एक प्रिंट आऊट (print Out) काढून घ्या.
  • 7. ॲडमिट कार्डमध्ये कोणती माहिती उपलब्ध ? ( NEET UG Re-Exam)

नीट युजीच्या ॲडमिट कार्डमध्ये  उमेदवारांचे नाव, रोल नंबर आणि जन्मतारीख यासारखी सर्व महत्त्वाची माहिती असते. यासोबतच परीक्षा केंद्राचा (Exam Center) संपूर्ण पत्ता दिलेला असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना पोहोचण्यास सोपो जाते. परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची वेळ (Reporting Time) आणि परीक्षेेचे कडक नियम व मार्गदर्शक तत्त्वेही यात नमूद केलेली असतात. परीक्षा शुल्काच्या परताव्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एनटीएने उमेदवारांना ॲडमिट कार्ड डाऊनलोड करण्यापूर्वी आपले बँक खाते व्हेरीफाय करण्याचा सल्ला दिला आहे.

यावेळी परीक्षेसाठी नियम बदल ( NEET UG Re-Exam)

एनटीएने परीक्षा पद्धतीत काही आवश्यक बदल केले आहेत. उमेदवारांना आता परीक्षेसाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ मिळणार आहे, कारण परीक्षेचा कालावधी वाढवून 195 मिनिटे कऱण्यात आला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन प्रश्नपत्रिकेत कच्चे काम (Rough Work ) कऱण्यासाठी एकूण 4 पाने दिली जातील. यामध्ये दोन पाने सुरूवातीला आणि दोन शेवटी असतील .

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored