Shweta Tiwari श्वेता तिवारीच्या घरी आले थंड पेयासोबत झुरळ, 'तुकाराम मुंढेंना टॅग करत दिली माहिती .

Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीने इन्स्टामार्टवरून रेड बुल ऑर्डर केलें, मात्र डिलिव्हरीसोबत झुरळ घरात आल्याचा दावा केला. अभिनेत्रीने तुकाराम मुंडेंना टॅग करत व्हिडिओ शेअर केला.

मुंबई : 20-08-2026

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari)  सध्या ‘द ट्रेटर्स 2 ‘ मुळे चर्चेत आहे. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेक आली आहे. श्वेता तिवारीने ऑनलाईन ऑर्डर केलेल्या रेड बेलच्या डिलिव्हरीसोबत चक्क एक झुरळ घरात आल्याचा दावा केला आहे. याचा व्हिडिओ तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून, मजेशीर अंदाजात आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंना टॅग करत मदतीची मागणी केली आहे.

रेड बुलच्या डिलिव्हरीसोबत आलं झुरळं  (Shweta Tiwari)

श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवरून रेड बुल ऑर्डर केल्याचं व्हिडिओमध्ये सांगितले. मात्र, डिल्हिव्हरी मिळाल्यानंतर तिच्या घरात एक झुरळ फिरताना दिसलं. श्वेताने या झुरळाचा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.

व्हिडिओमध्ये झुरळ घरात इकडून तिकडे फिरताना दिसत आहे. श्वेताने कॅमेऱ्याने त्यावर झूम करत संपूर्ण प्रकार चाहत्यांना दाखवला.

‘मुंडेजी, तुम्ही कुठे आहात ?’ (Shweta Tiwari)

श्वेता तिवारीने हा प्रकार गंभीरपणे सांगण्याऐवजी विनोदी अंदाजात मांडला. ती म्हणताना दिसते, ” मी इन्टामार्टवरून रेड बुल ऑर्डर केले होते आणि त्या रेड बुलसोबतच इन्स्टामार्टमधून एक झुरळही आमच्या घरात आले “.

यानंतर झुरळ संपूर्ण घरात पळत असल्याचं दाखवत तिने म्हटलं, ” आपण तुकाराम मुंडे यांना टॅग करायचे का ? मुंडेजी, इन्स्टामार्टमधून आमच्या घरात झूरळे येत आहेत. तुम्ही कुठे आहात ? कृपया लक्ष द्या”. श्वेताने संबंधित डिलिव्हरी ॲपलही टॅग केलं आहे.

तुकाराम मुंडेंनाच का केलं टॅग ?  (Shweta Tiwari)

तुकाराम मुंडे हे त्यांच्या कडक प्रशासकीय शैलीसाठी ओळखले जातात. अन्न व औषध प्रशासनाशी संबंधित कारवाईमुळे ते अलिकडे चर्चेत आहेत. त्यामुळेच श्वेताने आपल्या व्हिडिओमध्ये त्यांना मजेशीर पद्धतीने टॅग केल्याचं दिसतं.

श्वेताचा हा व्हिडिओ विनोदी असला तरी, ऑनलाईन फूड डिलिव्हरीदरम्यान स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा मुद्दाही यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!